no images were found
संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी 1098 हेल्पलाइनवर संपर्क साधा
कोल्हापूर : संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीकरीता महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाइल्ड हेल्प लाइन सेवा 1098 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24X 7 हेल्पलाइन सेवा उपलब्ध आहेत. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही या सेवांद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. या निवेदनाद्वारे 1098 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
आपल्या आजूबाजूला आपल्याला जर बालकामगार, बालभिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरित आवश्यकती मदत कोठून व कशी मिळवून देता येईल या साठी कोठे संपर्क करावा या बाबत सामान्य नागरीकामध्ये संभ्रम असतो, यासाठी चाइल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. एस. वाईंगडे यांनी दिली आहे.