
no images were found
विद्यार्थ्यांच्या ‘स्टार्टअप‘साठी विद्यापीठ कटिबद्ध: डॉ. सागर डेळेकर
कोल्हापूर (प्रतिनिधी): जगभरातील ‘स्टार्टअप’च्या यादीत अमेरिका, चीननंतर भारत तिसऱ्या स्थानी आहे. प्रथमस्थान प्राप्तीसाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यांनी सुरू केलेल्या ‘स्टार्टअप’ योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनांना आकार देत नवउद्योगांच्या स्थापनेसाठी शिवाजी विद्यापीठ कटीबद्ध आहे. असे प्रतिपादन नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य (आयआयएल) केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी केले.
हिंदी विभाग व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन (एसयूके आरडीएफ) च्या वतीने गुरुवारी आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हिंदी विभागाच्या प्र. प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी, तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. एस. एन. सपली, एसयूके आरडीएफचे संचालक डॉ. पी. डी. राऊत उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. राऊत यांनी एसयूके आरडीएफ व शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. आभार डॉ. प्रकाश मुंज यांनी मानले. यावेळी डॉ. सुषमा चौगुले, प्रा. अनिल मकर, श्रृतिका सरगर यांनी प्रश्न विचारले. या प्रसंगी इनक्यूबेटरचे मॅनेजर शिवानंद पाटणे यांनी विद्यापीठात सुरू असलेल्या नवउपक्रमांची माहिती दिली.
यावेळी डॉ. संतोष कोळेकर, डॉ. अक्षय भोसले, डॉ. गीता दोडमणी, प्रा. प्रकाश निकम, डॉ . जयसिंग कांबळे यांच्यासह विद्यार्थी, संशोधक उपस्थित होते.