no images were found
दुसऱ्या पत्नीचीही दोन बाळांसह त्याच विहिरीत आत्महत्या, विचित्र घटनेने एकच खळबळ
सोलापूर : जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कुसळंब गावात बाबासाहेब प्रभाकर काशीद यांच्या दुसऱ्या पत्नीने दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या पहिल्या पत्नीनेही सुमारे पाच वर्षांपूर्वी पत्नीने दोन मुलांसह याच विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. या विचित्र घटनेने एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ वक्त केली जात आहे.
रोहिणी बाबासाहेब काशीद असे मृत महिलेचे नाव आहे. तर अनिश काशीद (वय दीड वर्ष) व अक्षरा काशीद ( वय ४ महिने ) अशी दोन लहान मुलांची नावे आहेत. या महिलेने आपल्या दोन मुलासह त्यांच्याच शेतातील विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे. याबाबत बार्शी ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी कुसलंब येथे धाव घेतली.
ज्या विहिरीत आत्महत्या केली त्या घटनास्थळी भेट देऊन रोहिणी काशीदसह दोन लहान मुलांचा शोध घेऊन अग्निशमन दलाचा मदतीने हे तिन्ही मृतदेह बाहेर काढले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. रोहिणीने आत्महत्या का केली? याच्या तपास बार्शी तालुका पोलीस करीत आहेत . बार्शी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी मृतदेह दाखल करण्यात आले आहे.
बाबासाहेब काशीद यांच्या पहिल्या पत्नीने याच विहिरीत सुमारे पाच वर्षांपूर्वी दोन मुलींसह आत्महत्या केली होती. पहिल्या पत्नीचे नाव राधा काशीद असे होते. घरगुती कारणावरून पहिल्या पत्नीने दोन मुलींसह याच विहिरीत आत्महत्या केली होती. आणि आता दुसरी पत्नी रोहिणी हिने देखील त्याच विहिरीत दोन लहान मुलांसह आत्महत्या केली आहे. याबाबत अधिक तपास एपीआय शिवाजी जयपात्रे करत आहेत.