no images were found
एनआयटी कोल्हापूरमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण.
कोल्हापूर ( प्रतिनिधी ):-स्वतंत्र भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी, न्यू माध्यमिक विद्यालय आणि न्यू कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात संस्थेचे विकास अधिकारी तथा एनआयटीचे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांचे शुभहस्ते ध्वजारोहण झाले. आपला देश स्वतंत्र होताना सत्ता हस्तांतरण करणे हे एक मोठे आव्हान होते. अठरापगड जाती, भाषा, संस्कृती असलेल्या भारतीय जनतेला आपल्या राष्ट्रपुरुषांनी तिरंगा ध्वजाखाली आणले. आपले राष्ट्र असेच एकसंघ राहण्यासाठी आपण विविधता स्विकारली पाहिजे असे प्रतिपादन डाॅ. दाभोळे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी १८५७ चा उठाव ते स्वातंत्र्यापर्यंतचा इतिहास आपल्या देखाव्यांतून उपस्थितांसमोर उभा केला. राष्ट्रपुरुष, क्रांतिकारी, स्वातंत्र्यसेनानी यांच्या व्यक्तिरेखा व स्वातंत्र्यलढ्याचे देखावे साकारत विद्यार्थ्यांनी विविधतेतून एकतेचा संदेश दिला. तसेच, विद्यार्थ्यांनी कॅनव्हासवर ‘हर घर तिरंगा’ व ‘ जय हिंद’ चितारले. तिरंगा ध्वजासह सेल्फीही काढले. कार्यक्रमास शाश्वतग्यान फौंडेशनचे प्रमुख जी. जाॅर्ज, विद्यालयाचे मुख्याध्यापक उदयकुमार संकपाळ, फार्मसीचे प्राचार्य डाॅ. सचिन पिशवीकर, डाॅ. नितीन पाटील, विभागप्रमुख, तिन्ही शाखांचा स्टाफ आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रविण जाधव, जयश्री पाटील व माधुरी पाटील यांनी केले.