
no images were found
केएमसी कॉलेजच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन
कोल्हापूर ( प्रतिनिधी ):- महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज एनसीसी विभागाच्यावतीने 77 व्या स्वातंत्र दिनानिमित्त 56 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. के. एम. सी. कॉलेज, जी.के.जी.कॉलेज, शाहू दयानंद स्कूल, इंदिरा गांधी विद्या निकेतनच्यावतीने हर घर तिरंगा या रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅलीची शाहू दयानंद हायस्कूल पासून सुरु करुन मंगळवार पेठ, बेलबाग, खासबाग मैदान , बिंदू चौक, मिरजकर तिकटी, मंडलिक गल्ली, पद्मावती मंदिर या मार्गाने काढण्यात आली. या रॅलीमध्ये एन.सी.सी.चे 102 कॅडेट व 3 एन.सी.सी. ऑफिसरांसह प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एन.उलपे, प्रा.रवींद्र मांगले, प्रा.युवराज मोटे सहभागी झाले होते. तसेच या रॅलीसाठी 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कमांडिंग ऑफिसर कर्नल पुनीत गोगिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एन उलपे, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या रॅलीचे नियोजन कॅप्टन डॉ.अमित रेडेकर, लेफ्ट डॉ.डि.के.नरळे, ऑफिसर अजित कारंडे, ऑफिसर संग्राम सोनार यांनी केली.