Home सामाजिक “एक राखी सीमेवरील जवानांसाठी” या देशरक्षाबंधनाच्या कार्यक्रमात राख्या पाठवून सहभागी होण्याचे श्री. स्वामी विवेकानंद चॅरीटेबल ट्रस्टचे आवाहन 

“एक राखी सीमेवरील जवानांसाठी” या देशरक्षाबंधनाच्या कार्यक्रमात राख्या पाठवून सहभागी होण्याचे श्री. स्वामी विवेकानंद चॅरीटेबल ट्रस्टचे आवाहन 

6 second read
0
0
27

no images were found

“एक राखी सीमेवरील जवानांसाठी” या देशरक्षाबंधनाच्या कार्यक्रमात राख्या पाठवून सहभागी होण्याचे श्री. स्वामी विवेकानंद चॅरीटेबल ट्रस्टचे आवाहन 

कोल्हापूर – ” एक राखी सीमेवरील जवानांसाठी” सामाजिक उपकक्रम कारगील युध्दापासून गेली 25 वर्ष विवेकानंद ट्रस्ट घेत असून यंदा या कार्यक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. फक्त युध्दाच्या वेळीच नव्हे तर 24 तास जीवावर उदार होऊन लढणाऱ्या देश रक्षण करणाऱ्या जगातील विविध भागात व देशांतर्गत पुरपरिस्थिती, भूकंप या सारख्या नैसर्गिक आपत्ती वेळी सुध्दा मोठे बलिदान देऊन लढणाऱ्या सैनिकांचे नैतिक बळ वाढवण्यासाठी प्रतिवर्षी विविध शाळा महावि‌द्यालये, महिला बचतगट, महिला संस्था यांचेकडून जमा केलेल्या एक लाखाहून अधिक राख्या लष्करी अधिकाऱ्यांकडे शुक्रवार दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता जाहिर कार्यक्रमाव्दारे सुपूर्त केल्या जाणार आहेत. राख्या बांधणारे हात कमी होऊ नयेत. बेटी बचाओ, बेटी पढाओ या जनजागृतीसह सदर उपक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक्रमात शिवगंधार प्रस्तुत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. राख्या पाठविण्यासाठीची संकलन केंद्रे पुढीलप्रमाणे.

संकलन केंद्रः कोल्हापूर शहर प्रबोधन क्लासेस- आझाद चौक, नागराज पेपर स्टॉल – शुक्रवार गेट, कामत झेरॉक्स- शहाजी कॉलेज आणि टेंबे रोड, भिवटे पोहे सेंटर महाद्वार रोड, हॉटेल चिनी चायनीज-अर्बन बँकेजवळ, ताराबाई पार्क, भगिनी मंच- शनिवार पेठ, देवयानी नेट कॅफे / कॉम्प्युटरचे दुकान ईगल प्राईड, मिरजकर तिकटी, मैत्रिण मंच समर्थ ज्वेलर्स, पंचरत्न प्लाझा, गुजरी, श्रीराम सलुन- रघुनाथ टिपुगडे, मेन रोड राजारामपुरी ५ वी गल्ली, जय महाराष्ट्र रसवंती गृह कमलाकर किलकिले,रविवार पेठ, लक्ष्मीपुरी आनंद मिल्क कॉर्नर- किरण पोवार, मिरजकर तिकटी, पाण्याच्या हौदाजवळ, म्हाडगुत पोहे सेंटर- महा‌द्वार रोड, वांगी बोळासमोर, अभिजीत न्यूज पेपर एजन्सी- श्री लस्सी समोर, रंकाळा वेस स्टँड, दै. सिंधुदुर्ग समाचार ताराबाई पार्क, ए. एस. पाठक ज्वेलर्स हॉटेल ओशो शेजारी, बिनखांबी गणेश मंदिरा – रोड, कोल्हापूर, राधानगरी तुषार साळगांवकर, विजय बकरे पेपर स्टॉल, साई फोटो – स्टुडिओ नंदू गुरव (पत्रकार) मेन रोड, राधानगरी, गारगोटी पत्रकार सविता सुभाष माने (भुदरगड टाईम्स), बांबवडे – रत्नश्याम ज्वेलर्स नामदेव गिरी, बाजारपेठ, बांबवडे, ता. शाहूवाडी. –

वरील संकलन केंद्रावर गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सायं. 5 पर्यंत राख्या पाठवाव्यात अथवा प्रत्यक्ष कार्यक्रमास उपस्थित राहून द्याव्यात. पारंपारिक बंधुप्रेमासह रक्षाबंधनाला व्यापक सामाजीक आयाम देणाऱ्या या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी केले असून या उपक्रम यशस्वीतेसाठी किशोर घाटगे, राजेंद्र मकोटे, सौ. सीमा जोशी, कमलाकर किलकिले, किरण नकाते, सुखदेव गिरी, सीमा मकोटे ,डॉ. सायली कचरे, प्रशांत बरगे, महेश कामत, मालोजी केरकर, धनंजय नामजोशी, तुषार साळगावकर, सौ. यशश्री घाटगे, डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, अशोक लोहार, नंदू गुरव, रघुनाथ टिपुगडे, डॉ. आनंद गुरव, सागर घोरपडे, उमेश निरंकारी आदि कार्यरत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…