Home शैक्षणिक सायबर इन्‍स्‍टिट्यूटमध्ये उभारला आनंद भवन ऑडिटोरियम हॉल

सायबर इन्‍स्‍टिट्यूटमध्ये उभारला आनंद भवन ऑडिटोरियम हॉल

24 second read
0
0
35

no images were found

सायबर इन्‍स्‍टिट्यूटमध्ये उभारला आनंद भवन ऑडिटोरियम हॉल

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):  आनंद भवन हे एक बहुउद्देशीय सभागृह आहे. या इमारतीमध्ये खालील बाजूस टेनिस कोर्ट तसेच मुले व मुलींसाठी जिम, व्यायामशाळा आणि इतर छोटे हॉल ज्यामध्ये सराव प्रदर्शने इत्यादी उपक्रम राबवता येतील अशी योजना आहे. मुख्य ऑडिटोरियमला दोन्ही बाजूकडून छोटी लिफ्ट असेल कलाकारांना थेट रंगमंचाकडे घेऊन जाऊ शकते. सदर ऑडिटोयमची एकूण आसन क्षमता ८०० इतकी आहे. तळमजल्यावरती साडेपाचशे आणि गॅलरीमध्ये अडीचशे प्रेशक बसू शकतात. या भव्य दालनाचे शास्त्रोक्त पद्धतीने ध्वनी संयोजन केले आहे.
तसेच प्रकाश रचनाही अद्ययावत, आंणि सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना पुरेशी आहे. डिजिटल स्क्रीन प्रेक्षकांकरीता जवळून दृश्य पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. रंगमंचाचा आकार ४० चौ.फूट असून खालीवर सरकवता येणारे लाईटचे बिम्स बसविले आहेत. रंगमंचाचा पडदा स्वयंचलित असून मोटरच्या माध्यमातून उघडता किंवा बंद करता येतो शिवाय त्‍याला मानवी नियंत्रणानेसुद्धा वापरता येते. त्याचप्रमाणे अत्यंत आरामशीर आणि स्वस्थपणे बसून कार्यक्रम पाहता यावा यासाठी सर्वत्र खुर्च्या बसवल्या आहेत. पुढील विशेष अतिथींकरता असलेल्या खुर्च्या जास्त आकर्षक व शोभीवंत आहेत. सभागृहाचे लाईट आणि साऊंड यांचे नियंत्रण बाजूच्या कक्षातून करता येते. तसेच लाईव्ह मिक्सिंग आणि नियंत्रणा करता किंवा भाषण सभा इत्यादीं करता कलाकार आणि इतर सहकाऱ्यांसाठी विश्रांती घेण्याचे कक्ष आहेत.आणि आवश्यक पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कयार्यक्रमात व्यत्यय येऊ नये यासाठी स्‍वतंत्र जनरेटरची व्‍यवस्‍था करण्यात आली आहे.
प्रकल्‍पाचे नियोजन बरेच आधी केले होते पण या अडीच वर्षांमध्ये ही वास्‍तू संपूर्ण पूर्ण झाली आहे. अजूनही त्‍याचे अधिकृत उद्घाटन झालेले नाही. अशी माहिती संस्‍थेच्‍या पदाधिकाऱ्यांनी दिली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे जळीत ही दुर्दैवी घटना आहे. या पार्श्वभूमीवर शो मस्‍ट गो ऑन या तत्‍वावर प्रख्यात गायक हरीहरन यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द होऊन नुकसान होऊ नये आणि रसिक निराश होऊ नये म्‍हणून हे ऑडिटोरियम आयोजकांना कार्यक्रमापुरते वापरण्यास देण्याचे संस्‍थेने ठरविले आहे. तसेच सदरचे ऑडिटोरियम हे फक्त शैक्षणिक उपक्रमांकरीता उपलब्‍ध करुन देण्याच्‍या उद्देशाने उभारण्यात आले आहे असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…