Home निधन वार्ता ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांची कँन्सरशी झुंज ठरली अपयशी

ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांची कँन्सरशी झुंज ठरली अपयशी

10 second read
0
0
25

no images were found

ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांची कँन्सरशी झुंज ठरली अपयशी

 

मुंबई- मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज शनिवारी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. विजय कदम यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. विजय कदम हे गेले दीड वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 वाजता अंधेरी येथील स्मशानभूमी अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. विजय कदम यांच्या निधनाने हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

     विजय कदम यांनी चष्मेबहाद्दर, पोलीसलाईन, हळद रुसली कुंकू फसलं, आम्ही दोघे राजा राणी अशा चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केली. विजय कदम यांच्या निधनामुळे अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विजय कदम यांनी अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये अजरामर भूमिका साकारल्या. याशिवाय काही मालिकांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. टूरटूर, सही दे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये  त्यांनी भूमिका केल्या आहेत. यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या. 

      विजय कदम यांनी रंगभूमी गाजवलीच शिवाय सिनेसृष्टीमध्येही दमदार भूमिका साकारल्या. ‘चष्मेबद्दूर’, ‘मंकी बात’, ‘ब्लफमास्टर’, ‘टोपी घाला रे’, ‘भेट तुझी माझी’, ‘देखणी बायको नाम्याची’ या त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या. विजय कदम युवा रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी नव्या पिढीची नाटकं पाहायला हजेरी लावायचे. याशिवाय पुरस्कार सोहळ्यांमध्ये हजेरी लावून अनेक कलाकारांचं कौतुक करायचे. विजय कदम यांनी शेवटी झी मराठीवरील ‘ती परत आलीये’ मालिकेत बाबूराव तांडेल ही भूमिका साकारली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निधन वार्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…