no images were found
कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयातील सन 2025-26 वर्षासाठीच्या इयत्ता 6 वी च्या प्रवेशासाठी मुदत
कोल्हापूर : कागल येथील पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयात सन 2024-25 करीता इ. 6 वी प्रवेशासाठी होणारी प्रवेश परीक्षा दि. 18 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. परीक्षेचे ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांच्या पालकांनी www.navodaya.gov.in व https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर 16 सप्टेंबर 2024 पर्यंत करावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे. प्रवेशासाठी पात्रता यात विद्यार्थी इयत्ता 5 वीच्या वर्गात कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यताप्राप्त विद्यालयात शिकत असला पाहिजे. तसेच तो कोल्हापूर जिल्ह्याचा रहिवाशी असावा. उमेदवाराचा जन्म 1 मे 2013 पूर्वी किंवा 31 जुलै 2015 नंतरचा नसावा. विद्यार्थी इयत्ता 3 री ते 5 वी पर्यंत एक दिवस अथवा एक वर्ष जर शहरी विभागात शिकला असेल तर तो शहरी विभागात गणला जाईल. विद्यार्थी इयत्ता 3 री ते 5 वी पर्यंत सलग ग्रामीण विभागात शिकत असेल तर तो ग्रामीण विभागात गणला जाईल. विद्यार्थी इयत्ता 3 री ते 5 वी पर्यंत सलग उत्तीर्ण असावा, याची नोंद पालकांनी अर्ज भरताना घ्यावी.
किमान 75 टक्के प्रवेश हा ग्रामीण भागातील मुलांमार्फत भरला जाणार आहे. शासनाच्या आरक्षण नियमांनुसार एससी, एसटी, ओबीसी आणि दिव्यांगांना आरक्षण लागू राहिल. एक तृतींश जागा या मुलींसाठी राखीव असतील. प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यासाठी प्रथम www.navodaya.gov.in आणि https://cbseitems.rcil.gov.in/nvs या संकेतस्थळावर ऑनलाईन ॲप्लिकेशनवर जाऊन कॅडीडेट क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन वर अर्ज भरण्यास सुरुवात करावी. विद्यार्थ्याचे आधारकार्ड पालकांच्या मोबाईल नंबरला लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. मोबाईल नंबर लिंक नसल्यास विद्यार्थी इ. 5 वी कोल्हापूर जिल्ह्यात शिकत असल्यास आई वडिलांचा कोल्हापूर जिल्ह्यातील सरकारी रहिवाशी पुरावा अपलोड करावा. विद्यार्थ्यांचा शिकत असलेल्या शाळेच्या युडायसमधील परमनंट एज्युकेशन नंबर नमुद करणे आवश्यक आहे. संकेतस्थळावरुन इंपोर्टंट इन्फारमेशन मधून फॉरमॅट ऑफ स्टडी सर्टिफिकेट टू बी अपलोडेड मधून प्रमाणपत्र डाउनलोड करुन घ्यावे व त्यावर विद्यार्थी इ. 5 वी शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून संपूर्ण प्रमाणपत्र काटेकोरपणे भरुन त्यावर मुख्याध्यापकांचा सही व शिक्का घेवून त्यावर पालकांनी स्वतःची व विद्यार्थ्यांची सही, विद्यार्थ्याचा फोटो घेवून सर्व रकाने व्यवस्थित भरावेत.
नंतर हे संपूर्ण भरलेले प्रमाणपत्र घेवून परत www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर जावून भरुन दिलेले प्रमाणपत्र अपलोड करुन व सर्व माहिती व्यवस्थित भरुन आपला ऑनलाईन अर्ज यशस्वी झाल्यानंतर त्याची प्रिंट घ्यावी. तसेच ऑनलाईन अर्ज करतेवेळी पालकांनी विद्यार्थ्यांचा आधार कार्ड नंबर ज्या मोबाइल नंबरला लिंक आहे तो मोबाइल क्रमांक असणे अत्यंत गरजेचे आहे. जवाहर नवोदय विदयालय प्रवेश परीक्षा 2025 संदर्भातील अधिक माहिती www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.