
no images were found
क्रांती दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने हुतात्म्यांना मानवंदना, श्रध्दांजली व
पुष्पचक्र अर्पण
कोल्हापूर :- महापालिकेच्यावतीने प्रतिभानगर, सागरमाळ येथील हुतात्मा स्मारक येथे क्रांती दिनानिमित्त जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव माने यांच्या हस्ते ध्वजारोहन करुन हुतात्म्यांना मानवंदना, श्रध्दांजली, पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत व बिगुलवादन करण्यात आले.
यावेळी खादी ग्राम उद्योग अध्यक्ष सुंदरराव देसाई, महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष दिलीप पेटकर, जेष्ठ नागरीक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, एस.आर.पाटील, ऑनररी मेजर प्रा.डॉ.रुपा शहा, सहा.आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, प्रशासन अधिकारी आर.वी कांबळे, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, उपशहर अभियंता आर के पाटील, सहा.अभियंता व्यंकटेश सुरवसे, स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला, कांता बांधेकर, माजी नगरसेवक राजु हुंबे, जर्नादन पोवार, उमेश बुधले, वि.स.खांडेकर विद्यामंदिर, नानासाहेब गद्रे हायस्कुल, श्रीराम विद्यालय, सरस्वती चुनेकर विद्यामंदिर, लोकमान्य विद्यालय, मिलिंद हायस्कुलचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षिका व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वि.स.खांडेकर विद्यालयाचे शिक्षक सुधाकर सावंत यांनी केले.
यानंतर शास्त्रीनगर येथील लालबहाद्दुर शास्त्री यांच्या पुतळयास तसेच हुतात्मा पार्क मधील क्रांतीवीर कै.दत्तोबा तांबट व स्वातंत्र्यसैनिक कै.बळवंतराव बराले यांच्या पुतळयांनाही प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रवि तांबट, प्रभाकर तांबट, अभय तांबट, प्रा.अनिल घाटगे व महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते