no images were found
टेक्स्टाईल इंजिनिअरींग इच्छुक विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
इचलकरंजी (प्रतिनिधी): डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट ही संस्था टेक्स्टाईल मधील शिक्षणासाठी जगभर प्रसिध्द आहे. डीकेटीईमध्ये टेक्स्टाईल मधील पदविका, पदवी, पदव्युत्तर व पीएचडी कोर्सेस कार्यरत आहेत. या वर्षी पासून डीकेटीईस भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे नॅशनल टेक्निकल टेक्स्टाईल मिशन अंतर्गत बी.टेक. टेक्निकल टेक्स्टाईल हा टेक्स्टाईल मधील ४ वर्षाचा नवीन पदवी कोर्स सुरु करण्यासाठी मान्यता मिळाली आहे.
डीकेटीई संस्थेची स्थापना १९८२ साली झाली. येथे टेक्सटाईल डिप्लोमा मध्ये ३ पदविका अभ्यासक्रम जसे की डीटीएम,डीटीटी, डीएफसीटी, ५ पदवी अभ्यासक्रम जसे की टीटी,एमटीटी,टीसी,एफटी व टीपीई, एम.टेक. टेक्स्टाईल इंजिनिअरींग हा पदव्युत्तर अभ्यासक्रम, पीएचडी इन टेक्सटाईल इंजिनिअरींग अशा वैविध्यपूर्ण शिक्षणाची सोय आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून डीकेटीईमध्ये बी.टेक. टेक्नीकल टेक्स्टाईल या नवीन टेक्स्टाईल पदवी अभ्यासक्रमाची पायाभरणी होत आहे. चार वर्षाच्या या पदवी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना टेक्स्टाईल फायबर्स, मॅन मेड फायबर्स, वस्त्रोद्योग गुणवत्ता, नॉन वोव्हन तंत्रज्ञान, फायबर रिअन फोसर्ड कंम्पोझिट, लॅमिनेशन, नॅनो मटेरियल, स्मार्ट टेक्स्टाईल, टेक्निकल टेक्स्टाईल मधील विविध विभाग यांचा विस्तृतणे अभ्यास करता येणार आहे.
नॅशनल टेक्निकल टेक्स्टाईल मिशन हा भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रलयाचा एक उपक्रम आहे. ज्याचा उददेश भारतातील तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राच्या वाढीला आणि विकासाला चालना देणे हा आहे. तांत्रिक वस्त्रोद्योगातील महत्वाकांक्षी नवोदितांसाठी संशोधन आणि उद्योजकतेसाठी अनुदान देणे हा भारताच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने एनटीटीएम अंतर्गत सुरु केलेला एक उपक्रम आहे. टेक्नीकल टेक्स्टाईल मध्ये प्रोटोटाईप डिझाईन करणे आणि नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकीकरणाला समर्थन देण्यासाठी १८ महिन्यापर्यंत ५० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान याद्वारे मिळते.
भारतातील तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्र नवीन टप्प्यावर आहे, या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आर ऍण्ड डी ही महत्वाची भूमिका बजावते. यासाठी सरकारने गेल्या काही वर्षात ८ सेंटर्स ऑफ एक्सलन्स सीओई आणि ११ फोकस इन्क्युबेशन सेंटर्स एफआयसी स्थापन केले आहेत
डीकेटीई टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजी येथे ३० कोटी रुपयाचे सीओई नॉनओव्हन्स आणि कोटिंग आणि लॅमिनेशनमधील फोकसड इन्क्युबिएशन सेंटर आहे. भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रलयाकडून एनटीटीएम मिशन अंतर्गत डीकेटीईमध्ये टेक्निकल टेक्स्टाईलमध्ये ४ वर्षाचा अंडरग्रॅज्यूएट प्रोग्रॅम सुरु होत आहे व यासाठी आवश्यक टेक्निकल टेक्स्टाईल लॅब उभारणीसाठी डीकेटीई १५ कोटी निधीसाठी अर्ज केला आहे.
बी.टेक. टेक्निकल टेक्स्टाईल पदवी प्राप्त विद्यार्थी रिलायन्स इंडस्ट्रीज लि. अलोक इंडस्ट्रीज लि., अरविंद, सुप्रिम ग्रुप, एसआरएफ, बॉम्बे डॉईंग, वर्धमान, अहलस्ट्रॉम, गरवारे, डुपोंट, पी अँण्ड जी, ग्रॉहन्सन ऍण्ड घोन्सन, किम्बर्ली क्लार्क, रिलायन्स इंडस्ट्रीज लि, वेलस्पन इंडिया, सेंट गोबेन, खोसला प्रोफाईल, ट्रायडेंट ग्रुप इ. ख्यातनाम कंपन्यामध्ये उत्तम पॅकेजवर रुजू होतील व सक्षम अभियंता म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करतील.
भविष्यकाळामध्ये उपयोगीतेनुसार कापडची निर्मिती करणे हा अविभाज्य घटक असणार आहे. टेक्नीकल टेक्स्टाईल ची काळाची गरज ओळखून डीकेटीईने या नवीन कोर्सची सुरवात केली आहे. टेक्नीकल टेक्स्टाईल त्यांच्या अंतिम वापरावर अवलंबून आनेक श्रेणीमध्ये विभागले जावू शकतात. जसे की, कृषी वस्त्र शेतीमध्ये वापरले जाण-या कापडांना कृषी वस्त्र म्हणतात, बांधकामात वापरले जाणारे कापड, क्लॉथटेक, जिओटेक-जिओ टेक्स्टाईल, होमटेक, इडूटेक – औद्योगिक कापड, मेडिटेक-वैद्यकीय कापड, मोबिलटेक-वाहतुकीमध्ये वापरले जाणारे कापड, ओकोटेक किंवा इकोटेक – पर्यावरण अनुकूल कापड, पॅकटेक – पॅकेजिंग कापड, प्रोटेक – संरक्षणात्मक कापड, स्पोर्टटेक – स्पोर्टस टेक्स्टाईल.
वैष्टियपूर्ण तंतूचा शोध आणि जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचा समावेश यामुळे भविष्यात टेक्निकल टेक्स्टाईलची जागतिक बाजारपेठेत मागणी वाढतच राहणार आहे त्यामुळे या क्षेत्रातील पदवी संपादन करण्यासाठीची सुवर्णसंधी डीकेटीईने उपलब्ध करुन दिलेली आहे.