no images were found
ॲमेझॉन अलेक्साने केलेल्या सर्वेक्षणात, ५४ टक्के पालकांकडे मुलांच्या प्रश्नाचे त्वरित उत्तरे नसतात
कोल्हापूर : मुले जन्मजात जिज्ञासू असतात आणि पालक नेहमीच त्यांची उत्सुकता भागवणारी अचूक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत असतात. अमेझॉन अलेक्सा द्वारे सुरू केलेल्या आणि कँटार तर्फे जून २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहा शहरांतील ७५० हून अधिक पालकांमध्ये केलेल्या अलीकडील अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की सर्वेक्षण केलेल्या पालकांपैकी सुमारे ५४ टक्के पालकांना नेहमी असे वाटते की त्यांच्याकडे मुलांच्या प्रश्नांची त्वरित उत्तरे नसतात. यात पुढे असेही सूचित करण्यात आले आहे की ५२ टक्के प्रतिसादक त्यांना उत्तर माहित नसल्यास ते त्वरित शोधतात आणि अचूकपणे उत्तर देतात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सर्वेक्षण केलेल्या ४४ टक्के पालकांनी त्या त्या क्षणी जागेवरच उत्तरे तयार केल्याचे मान्य केले. केवळ ३ टक्के सर्वेक्षण केलेले पालक प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात किंवा मुलाला प्रश्न विचारण्यापासून रोखण्यासाठी विषय बदलतात
“कार कशी बनवायची?”, “विश्व किती मोठे आहे?”, “विमान कसे उडते?” आणि “मासे पाण्याखाली श्वास कसा घेतात?” इत्यादी मुलांनी विचारलेले काही जिज्ञासू प्रश्न आहेत. सर्वेक्षण केलेल्या पालकांपैकी सुमारे ६० टक्के पालकांनी सूचित केले की जेव्हा मुले “हिवाळा आणि उन्हाळा यांमध्ये कोणता ऋतू येतो?”, “पालकांना काम का करावे लागते?” आणि “आपण भाज्या का धुतो?” असे वरकरणी सोपे वाटणारे प्रश्न विचारतात तेव्हा बऱ्याचदा अडखळायला होते. काही पालक उत्तरासाठी आपल्या जोडीदाराकडे वळतात. सर्वेक्षणातील ३७ टक्के पालकांनी त्यांच्या मुलांना त्यांचे प्रश्न घेऊन दुसऱ्या पालकाकडे जायला सांगितल्याचे मान्य केले आहे.
टीव्ही पाहताना मुले अधिक प्रश्न विचारतात
मुलांच्या जिज्ञासेला चालना मिळण्याबाबत या अभ्यासात पुढे अधिक स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये ६३ टक्के पालकांनी उघड केले आहे की त्यांची मुले टीव्ही पाहताना अधिक चिकित्सक होतात आणि प्रश्न विचारतात. प्रवास (५७ टक्के), अभ्यास (५६ टक्के), मैदानी खेळ, उपक्रम ( ५५ टक्के), हातातील उपकरणांवर आशय पाहणे (५२ टक्के), आणि प्रौढांमधील संभाषणे ऐकणे (५० टक्के) या इतर पाच गोष्टी मुलांमध्ये कुतूहल निर्माण करतात. शिवाय, अन्न, प्राणी, निसर्ग, सा
तंत्रज्ञानाने पालकांना त्यांच्या मुलांपर्यंत माहितीची दारे खुली करण्याच्या आणि हस्तांतरित करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात मदत केली आहे.
सर्वेक्षण पुढे सांगते की ८० टक्क्यांपेक्षा जास्त पालक सहसा माहिती शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. अलेक्सा सह व्हॉईस एआय सेवांसारखे तंत्रज्ञान पालकत्वासाठी खूप सहाय्यक ठरू शकते. कारण ते पालकांना त्यांच्या मुलांच्या प्रश्नांची माहिती किंवा उत्तरे शोधण्यात मदत करू शकते पालक विज्ञानापासून इतिहासापर्यंत आणि त्या पलीकडे जात विविध विषयांवर कितीही प्रश्न विचारून अलेक्सा ची मदत घेऊ शकतात.
“उत्स्फूर्त प्रश्न विचारण्यापासून त्यांच्या वयाला अनुरूप नसलेले असे अधिक ज्ञान-आधारित किंवा अपारंपरिक असे प्रश्न विचारण्यापर्यंत मुले जन्मजात जिज्ञासू असतात आणि सभोवतालच्या जगाबद्दल सतत उत्तरे शोधण्याच्या मार्गावर असतात. पालकांनी त्यांच्या प्रश्नांना माहितीपूर्ण, सोप्या पद्धतीने समजणारी, रचनात्मक आणि त्यांच्या वयाला साजेशी उत्तर देणे महत्त्वाचे आहे,” असे अलेक्सा अमेझॉन इंडीयाचे कंट्री मॅनेजर दिलीप आर.एस म्हणाले. “आज जगभरात, लहान मुले असलेली कुटुंबे अलेक्साला दर महिन्याला २५ दशलक्ष प्रश्न विचारतात. अलेक्सा पालकांसाठी माहिती आणि शिक्षण केंद्र बनल्याची ही पावती आहे. लहान मुले असलेली कुटुंबे अलेक्सा चा अनुभव कसा घेतात, दररोज संबंधित कौशल्यांसह नवीन गोष्टी शिकण्यास अलेक्सा कशी मदत करू शकते आणि असे करताना त्यात मजा, आनंदही घेण्यात सतत सुधारणा करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.”
पालक त्यांच्या मुलांना अधिक प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करतात
मुलांचा सातत्याने विकास होण्यासाठी आणि नवीन गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांना मदत करण्याकरता अधिकाधिक प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करत असल्याचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त पालकांनी मान्य केले. मुलांच्या प्रश्नांना उत्तर देण्याच्या या प्रक्रियेत आपण स्वत: नवीन गोष्टी शिकत असल्याचे जवळजवळ ९२ टक्के पालकांनी सांगितले.
कँटारच्या दक्षिण आशिया इनसाइट्स विभागाचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक दीपेंदर राणा , म्हणाले, “आताच्या काळातील मुले ही अधिक चौकस आहेत आणि पालक नेहमीच त्यांचे कुतूहल पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. टीव्ही पाहण्याने मुलांमध्ये कुतूहल वाढते आणि अनेकदा ते ज्या गोष्टी पाहतात आणि ऐकतात त्याबद्दल अधिक प्रश्न विचारतात. बहुसंख्य सर्वेक्षण केलेले पालक त्यांच्या मुलांसाठी स्क्रीन-मुक्त शिक्षणाला प्राधान्य देतात. आणि येथेच व्हॉइस-फर्स्ट सर्च महत्वाचा ठरतो. पालकांनी किंवा मुलांनी त्यांच्या उपस्थितीत हा सर्च केला असला तरीही, उत्तरे शोधण्यासाठी आणि जगाबद्दल जाणून घेण्यासाठी हा उत्तम स्क्रीन-मुक्त उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे.”