
no images were found
सोनी सबवर 12 ऑगस्टपासून श्रीमद् रामायण सुरु होणार..
भारतातील प्रमुख कौटुंबिक मनोरंजन वाहिनी सोनी सबवर 12 ऑगस्टपासून श्रीमद् रामायण प्रसारीत होणार आहे. या प्रसिद्ध कथेचा पुढचा अध्याय यात दाखवण्यात येणार आहे. भगवान राम आणि रावणातील पौराणिक युद्धाची समाप्ती 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.30 वाजता सोनी सबवरून प्रसारीत होईल. त्यात खूप अॅक्शन सीन असतील. या युद्धानंतर सोनी सब आता युद्धानंतर सुरु झालेली अनोखी कहाणी समोर आणणार आहे. भगवान राम आणि सीता पुन्हा एकत्र आल्यानंतर तसेच अयोध्येत आल्यानंतर काय घडते, हे त्यात दाखवले जाईल. श्रीमद् रामायणाच्या दिव्य कथेतील या पुढच्या भागात अयोध्येला परत येणं आणि त्यांची जुळी मुले- लव आणि कुश यांच्या जन्मानंतर राम आणि सीतेच्या आयुष्यातील आनंद व इतर आव्हाने अशी कथानकं आहेत. प्रभू श्री राम आणि सीता अयोध्येला परत आल्यानंतर त्यांच्या जीवनातील अकथित कहाण्या आणि त्यांचे सखोल अर्थ खूप सुंदरपणे वर्णन केले आहेत.
प्रतिक्रिया:
नीरज व्यास, बिझनेस हेड, सोनी सब
सोनी सबवर प्रेक्षकांसाठी श्रीमद् रामायणाचा पुढचा भाग सादर करताना आम्हाला खूप आनंद गोत आहे. मालिकेचे कथानक अत्यंत प्रभावी आहे. उत्तम कौटुंबिक मूल्यांचं चित्रण आपल्या वाहिनीच्या तत्त्वांशी हे उत्तम रितीने जुळते. या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन होईल तसेच आपल्या प्रेक्षकांनाही जीवन अधिक समृद्धपणे जगण्याची प्रेरणा मिळेल. .”
सुजय रेऊ- प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत
सोनी सब कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत पाहता येईल अशा मालिका सोनी सबवर दाखवण्यात येत आहे. तसेच मालिकांच्या कथाही अत्यंत सार्थक आणि आत्मचिंतन करायला लावणाऱ्या असतात. त्यामुळे वाहिनीच्या परंपरेचा भाग बनणं असामान्य आहे. प्रेक्षकांसमोर या नव्या कथेत रामाची भूमिका करताना मी खूप उत्साही आहे. ही मालिका कालातीत आहे. प्रभू श्रीरामाची भूमिका निभावणे हा एक विनम्र अनुभव आहे. हा नवा अध्याय प्रेक्षकांसमोर ठेवण्यासाठी मी आता फार काळ वाट पाहू शकणार नाही..
प्राची बंसल- सीतेच्या भूमिकेत
ही मालिका सोनी सबवर प्रसारीत होणार असल्याने मी खूप आनंदी आहे. मी आणि माझे कुटुंब बराच वेळ या वाहिनीवरील मालिका पाहत असतो. त्यामुळे माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मला आशा आहे की, ही मालिका आमच्या कुटुंबाप्रमाणेच देशभरातील अनेक परिवार आपल्या माणसांसोबत पाहतील. आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहतील. सीतेची छवी, सहनशीलता आणि अमर्याद भक्तीतून मला प्रेरणा मिळते. आगामी भागात ही भूमिका करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तिच्या जीवनातील नवे अनुभव इथे पहायला मिळतील.