Home शासकीय पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग राहणार बंद; पर्यायी मार्ग असा असेल…

पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग राहणार बंद; पर्यायी मार्ग असा असेल…

8 second read
0
0
49

no images were found

पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग राहणार बंद; पर्यायी मार्ग असा असेल…

 पुणे :  पुण्यातील चांदणी चौकातील असणारा पूल वाहतूक मार्गात नेहमी अडसर होत असल्याने तो पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोएडातील अनधिकृत बिंल्डींग्स पाडण्यात आल्या त्याच पद्धतीने हा पूल पाडण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबरच्या पहाटे 2 वाजता हा पूल तुकड्यांमध्ये पाडला जाणार आहे. त्यासाठी 1 ऑक्टोबरच्या रात्री 11 वाजल्यापासून 2 ऑक्टोबरच्या सकाळी 8 वाजेपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, यासाठी नियोजन पूर्ण झाले आहे. केवळ ५ सेकंदांमध्ये हा पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहरचे पोलीस उपायुक्त वाहतूक राहूल श्रीरामे यांनी जारी केले आहेत.

वाहतुकीतील बदल 1 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते 2 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत अथवा आवश्यकतेनुसार पूल पाडण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

वाहतुकीतील बदल-

मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही ऊर्से टोलनाका येथेच थांबविण्यात येणार आहे. साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविण्यात येणार आहे. मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतूकीस बंदी करण्यात येणार आहे. मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंड ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील घोडावत चौक या दरम्यान दोन्ही बाजून सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीस बंदी राहील.

वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग- मुंबईकडून येणारी हलकी व प्रवासी चारचाकी वाहने ऊर्से टोलनाका येथून जुन्या पुणे- मुंबई रस्त्याने भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा, बोपोडी चौक, इंजिनीअरींग कॉलेज चौक, संचेती चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

वाकड चौक डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरुन विद्यापीठ चौक, संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

राधा चौक डावीकडे वळून बाणेर रोडने विद्यापीठ चौक, उजवीकडे वळून संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांकरीता- खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, पुणे सातारा रोडने जेधे चौक, डावीकडे वळून सारसबाग, पुरम चौक, डावीकडे वळून टिळक रोडने खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन रोडने वीर चाफेकर चौक, डावीकडे वळून विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगांव पूल अंडरपास, सिंहगड रोडने राजाराम पूल, डी.पी. रोडमार्गे नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…