
no images were found
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेवून दैनंदीन खर्चास फाटा देवून दिला पूरग्रस्तांना आधार
इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी मध्ये आलेल्या महापुरामुळे गावभागातील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला असून आपले पशूधन घेवून मिळेल त्या ठिकाणी असरा घेतलेला आहे. पूरकालावधीमध्ये मुक्या जनावरांना चा-याची प्रचंड गरज भासली असून हा चारा इचलकरंजी व आसपासच्या परिसरामध्ये पूराच्या पाण्याने वाहून गेलेला आहे यामुळे मिरज पूर्व भागात चारा उपलब्ध असल्याने तेथे जावून जनवारांच्यासाठी चारा विकत घेवून हा चारा सर्व पूरग्रस्त शेतक-यांना डीकेटीईच्या एनएसएस विभागाच्या वतीने देण्यात आला.
यासाठी इचलकरंजीतील विविध मंडळे व सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील हातभार लावला आहे. डीकेटीईचा एनएसएस विभाग नेहमीच सामाजिक कार्यात आग्रेसर असून, डीकेटीईचे कांही विद्यार्थी व स्टाफ हे स्वतः पुरग्रस्त असून त्यांनी पुरग्रस्तांनसाठी एक हात मदतीचा या अनुषंगाने गावभागामध्ये व जेथे जनावरांच्या छावण्या आहेत तेथे जावून हा चारा वाटण्यात आला. डीकेटीईचे एनएसएस प्रमुख डीन सचिन कानिटकर, ज्येष्ट पत्रकार संजय खूळ, राजू चव्हाण, किरण पाटील, अरविंद निंबाळकर, किरण लंगोटे, डॉ प्रकाश पाटील, एनएसएस विद्यार्थी समन्वयक प्रसाद सरगर, प्रथमेश पाटील, प्रतिक्षा पाटील, जान्हवी काटू, राधा जहागीरदार तसेच भागातील नागरिक यांच्या हस्ते चारा वाटप करण्यात आला.
चारा वाटप करण्यासाठी सुनिल सोनटक्के, इस्माईल शेख, महादेव पाटील, दत्ता सुतार, किरण चाबुक, मधुसुधन ग्रुप, ओम सुनिल ग्रुप, गणेश साबळे, महेश सेवा समितीचे पवन लड्डा, दिलीप सारडा, दिलीप बजाज यांनी मोलाची मदत केली आहे. पूरस्थिती बिकट असल्यामुळे शेतक-यांवर दुहेरी संकट आल्याने जनवारांना मुबलक चारा उपलब्ध होत नसल्याने येणा-या दोन दिवसात परत चारा वाटण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात आजी माजी विद्याथीर्र्, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे, प्र.संचालिका डॉ एल.एस.आडमुठे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.