Home मनोरंजन कोल्हापुरचे बांधकाम व्यावसायिक अमित जाधव आता सिनेनिर्मिती क्षेत्रात

कोल्हापुरचे बांधकाम व्यावसायिक अमित जाधव आता सिनेनिर्मिती क्षेत्रात

7 second read
0
0
32

no images were found

कोल्हापुरचे बांधकाम व्यावसायिक अमित जाधव आता सिनेनिर्मिती क्षेत्रात

 
 
 
मानवी नातेसबंध, तांत्रिक, रहस्य, अतर्क्य घटना असलेल्या “बारदोवी” या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरने चित्रपटाविषयीची उत्कंठा वाढवली असून, कसलेले अभिनेते, गुंतवणारं कथानक असलेला हा चित्रपट २ ऑगस्टला भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कोल्हापुरचे सुपुत्र असलेले सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमित जाधव यांनी केले आहे. 
 
गेली २० वर्ष बांधकाम क्षेत्रात काम केल्यावर अजून  काही नवीन करता येईल का? अशी इच्छा माझ्या मनात होती. तेव्हाच माझी ओळख लेखक, दिग्दर्शक करण चव्हाण यांच्यासोबत झाली. त्यांनी याआधी बनवलेला एक मराठी चित्रपट मला आवडला होता. त्यानंतर त्यांनी मला “बारदोवी’ या चित्रपटाची कथा ऐकवली जी मला आवडली आणि लगेचच मी माझा मुलगा अर्जुन सोबत चर्चा करून हा चित्रपट निर्माता म्हणून करण्याचे ठरविले असे निर्माते अमित जाधव यांनी सांगितले.   
 
“बारदोवी” या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन करण शिवाजीराव चव्हाण यांनी केलं आहे. सतोरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत “बारदोवी” या चित्रपटाची निर्मिती कृष्णार्पण मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. अमित जाधव, अर्जुन जाधव, प्रणित माणिक शिवाजी वायकर, संदीप बाबूराव काळे, एल्विन राजा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर छाया कदम सहनिर्मात्या आहेत. तर संतोष बळीराम तांबे, रवीराज शिवाजी वायकर, अभिजित सुमन वसंत पाटील, नितीन पाटील सहायक निर्माता आहेत. छाया कदम यांच्यासह चित्रपटात चित्तरंजन गिरी, विराट मडके यांच्यासारखे कसलेले कलावंत आहेत.तर विक्रम पाटील यांनी कॅमेरा, अरविंद मंगल यांनी प्रोडक्शन डिजाइन आणि विकास डीगे कार्यकारी निर्माता आहेत.
 
चित्रपटाचा ट्रेलर मती गुंग करणारा आहे. चित्रपटाचं चित्रीकरण आणि व्हीएफएक्स उच्च दर्जाचे आहेत. त्यामुळे कसदार कथानकाला दमदार तांत्रिक बाजू, पार्श्वसंगीताची  साथ असल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं. म्हणूनच हा चित्रपट हिंदीतील वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे. ट्रेलरमुळेच चित्रपटाविषयीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…