Home शासकीय नवमतदारांनी व नागरिकांनी वोटर सर्व्हिस पोर्टल’ व वोटर हेल्पलाईन ॲपचा वापर करुन मतदार नोंदणी व दुरुस्ती करा – अमोल येडगे

नवमतदारांनी व नागरिकांनी वोटर सर्व्हिस पोर्टल’ व वोटर हेल्पलाईन ॲपचा वापर करुन मतदार नोंदणी व दुरुस्ती करा – अमोल येडगे

20 second read
0
0
19

no images were found

नवमतदारांनी व नागरिकांनी वोटर सर्व्हिस पोर्टल’ व वोटर हेल्पलाईन ॲपचा वापर करुन मतदार नोंदणी व दुरुस्ती करा – अमोल येडगे

 

कोल्हापूर : विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत १ जुलै २०२४ रोजी किंवा त्या आधी १८ वर्ष पूर्ण होणा-या नागरिकांना दि. १२ ऑगस्ट २०२४ या कालावधीत मतदार नोंदणी करता येणार आहे. २०२४ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजाविण्यासाठी ही महत्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी व नागरीकांनी ‘Voter Service Portal’ या लिंकव्दारे व ‘Voter Help Line App चा जास्तीत जास्त वापर करुन मतदार नोंदणी व दुरुस्ती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

            मतदार नोंदणी वाढविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असून हे कार्यक्रम व कालावधी पुढीलप्रमाणे आहे-

प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी- 25 जुलै  2024 (गुरुवार),

दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी – 25 जुलै 2024 (गुरुवार) ते 9 ऑगस्ट 2024 (शुक्रवार),

विशेष शिबिरे- 27  जुलै  (शनिवार) आणि 28 जुलै (रविवार) 2024,

विद्यार्थी, दिव्यांग, महिला यांसाठी विशेष शिबिरे – 1,2 आणि 3 ऑगस्ट 2024

तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जमातींच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे- 3 ऑगस्ट (शनिवार) आणि 4 ऑगस्ट (रविवार) 2024,

विशेष ग्रामसभा – 2 ऑगस्ट 2024 (सोमवार) पर्यंत व अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी -20 ऑगस्ट 2024 (मंगळवार) याप्रमाणे राबविण्यात येणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …