Home मनोरंजन फोकस्ड इंडियन फेम करण सोनावणेचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

फोकस्ड इंडियन फेम करण सोनावणेचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

3 second read
0
0
19

no images were found

फोकस्ड इंडियन फेम करण सोनावणेचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

आपल्या विनोदशील शैली आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर इंस्टाग्राम वर राज्य करणारा मराठमोळा सोशल मिडिया स्टार करण सोनावणे उर्फ फोकस्ड इंडियन आता मोठ्या पडद्यावर हिंदी सोबत मराठी चित्रपटात ही दणक्यात पदार्पण करण्यास सज्ज् झाला आहे.
करण पहिल्यांदाच जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित, कॉमेडी ने भरपूर, अतिशय यूनिक कथा असलेला  ‘एक दोन तीन चार’ ह्या नव्या मराठी चित्रपटात एका मुख्य भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजक करताना दिसणार आहे. निर्मात्यांनी आज करण केंद्रित एक खास टीझर रिलीज केला आहे, ज्यात करण चे धमाकेदार पंचलाइन खळखळुन हसवायला भाग पाडत आहेत.
सोशल मिडिया गाजवल्या नंतर करण चे फॅन्स त्याच्या ह्या नव्या अवताराची आतुरतेने वाट बघताय. प्रेक्षकांचा हा उत्साह बघता, आपल्या भावना शेअर करत करण म्हणतो की, “मला कळविण्यात आनंद होतोय की, आज माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे , तुम्हां सर्वांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत प्रवास करू शकलो, मला आशा आहे की, इंस्टाग्राम वर जस तुम्हीं माझ्यावर भरभरून प्रेम करता, तसच मोठ्या पडद्यावरही मला बघताना कराल. माझ्या प्रत्येक कामातून प्रेक्षकांना आनंद देण्याचा मी नक्किच प्रामाणिक प्रयत्न करत राहीन. “एक दोन तीन चार” सारख्या युनिक कथनाकेमध्ये मला सहभागी केल्याबद्दल जिओ स्टुडिओज आणि वरुण नार्वेकर यांचा मी आभारी आहे, निपून आणि वैदेही तसेच इतर कलाकारांबरोबर काम करतांना भरपूर मज्जा आली”.
वरुण नार्वेकर दिग्दर्शीत ‘एक दोन तीन चार’ ह्या चित्रपटात वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी बरोबर इतर कलाकार जसे  मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर दमदार भूमिकेत दिसणार आहेत.  त्यामुळे ह्या सर्वांसोबत करण ची जुगलबंदी नक्की कशी जमते हे बघणं रोमांचक ठरणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…