no images were found
माजी सैनिक समांतर आरक्षणातील स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक पदासाठी नोंदणी करा
कोल्हापूर : जिल्ह्यातील माजी सैनिक, युध्द विधवा, युध्द विधवा पाल्य तसेच सेना सेवेतील स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक पदाशी समकक्ष असलेल्या माजी सैनिक व युध्द विधवाचे पाल्य यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आस्थापनेवरील माजी सैनिक प्रवर्गातील स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक गट (क) च्या 32 रिक्त पदांसाठी संबधित सर्व कागदपत्रे व समकक्ष मुळ प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) घेऊन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे दिनांक 9 जुलै 2024 पर्यंत भेट देऊन आपले नाव नोंद करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त), ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.
स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक या पदासाठी अर्हता पुढीलप्रमाणे – दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शासनाकडून किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून घेण्यात येणारी किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक वर्ष मुदतीची पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण, किंवा शासनाने वेळोवेळी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्राफटसमन (वास्तुशास्त्रीय आरेखक) पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक) पाठयक्रम उत्तीर्ण अशी अर्हता धारण केलेली असावी. स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविकाधारक, पदवीधारक,पदव्युत्तर अशी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार पात्र ठरतात. माजी सैनिकाचे वय 55 वर्षापेक्षा जास्त नसावे, असेही पत्रकात नमुद आहे.