Home Uncategorized छत्रपती शिवाजी मार्केट मधील 5 गाळे इस्टेट विभागाकडून सील

छत्रपती शिवाजी मार्केट मधील 5 गाळे इस्टेट विभागाकडून सील

14 second read
0
0
40

no images were found

छत्रपती शिवाजी मार्केट मधील 5 गाळे इस्टेट विभागाकडून सील

कोल्हापूर  : सवलत योजनेमध्ये थकीत भाडे भरलेले नाही अशा 5 गाळेधारकांचे गाळे सोमवारी महापालिकेच्या इस्टेट विभागामार्फत सील करण्यात आले. महानगरपालिका मालकीच्या ए, बी, सी, डी व ई वॉर्ड च्या विविध मार्केटमधील सन 2015-19 व सन 2019-24 भाडे दंड/व्याजामध्ये सवलत योजना राबवून भाडे भरून घेण्याची कार्यवाही दि.14 जून 2024 अखेर सुरू होती. या सवलत योजनेमध्ये 1392 भाडे करार मुदत संपलेल्या गाळेधारकांपैकी 508 गाळेधारकांनी थकीत भाडे भरून दंड/व्याजावरील सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. परंतू ज्या गाळेधारकांनी सवलत योजनेमध्ये थकीत भाडे भरलेले नाही अशा गाळेधारकांचे गाळे सोमवारी सील करण्याची मोहिम राबविण्यात आली. यावेळी छ. शिवाजी मार्केट मधील 5 गाळे सील करण्यात आले.

            सदरची मोहिम प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व उप-आयुक्त-1 साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, सहा. अधिक्षक मकरंद जोशी, कनिष्ठ लिपीक गिरीश नलवडे, सौ. कल्पना शिरदवाडे, आकाश शिंदे, विष्णू चित्रुक व सदानंद फाळके यांनी भाग घेतला.

           ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असलेने थकबाकीदार गाळेधारकांनी आपली थकबाकी त्वरीत महापालिकेकडे भरून सहकार्य करावे व सील सारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन इस्टेट विभागामार्फत करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण &…