no images were found
लोकराजा राजर्षी छ. शाहू महाराज जयंतीनिमित्त डीकेटीईमध्ये वस्त्रोद्योगावार परिसंवाद संपन्न
इचलकरंजी (प्रतिनिधी): राजर्षी छ. शाहू महाराजांचे १५० व्या जयंती निमित्ताने जिल्हा परिषद, कोल्हापूर आणि डी.के.टी.ई. च्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट यांच्या संयुकत विद्यमानाने डीकेटीईमध्ये वस्त्रोद्योगातील आव्हाने या विषयावर परिसंवाद झाला. २६ जून या जयंती दिनी संस्थेचे संचालक डॉ राहूल आवाडे यांचे हस्ते प्रतिमापूजन करुन राजर्षी छ. शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली होती.
या परिसंवादामध्ये कोल्हापूर जिल्हा कार्यक्रम समीतीच्या वतीने अप्पर तहसीलदार सुनिल शेरखाने तसेच तलाठी, सोमनाथ शिंदे, कबनूर सर्कल ऑफीसर, राजू बावणे उपस्थित होते. सुरवातीला प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन होवून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला त्यानंतर संयोजक डॉ. एस.बी. म्हेत्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर ऍडशिनल तहसीलदार सुनिल शेरखाने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी वस्त्रोद्यागासमोरील समस्यांचा थोडक्यात आढावा घेवून कार्यक्रास शुभेच्छा दिल्या.
प्रा. डॉ. मंजुनाथ बुर्जी यांनी सर्वांची ओळख करुन दिली. या परीसंवादासाठी सुप्रसिध्द उद्योजक संजय क्वाणे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते त्यांचे सवे उद्योजक पी.एम.सोज, श्रीकांत पाटील, चंद्रशेखर वास्कर, तुषार सुलतानपुरे यांनी आपआपले अनुभव सांगून सहभाग घेतला. तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय क्वाणे यांनी अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमास वस्त्रोद्योगातील उद्योजक व प्राध्यापक चांगल्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सुनिल शेरखाने यांनी परीसंवादाबददल समाधान व्यक्त केले. सदर परिसंवादाचे संयोजन डॉ एस.बी. म्हेत्रे व डॉ एम.बी. चौगुले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एन.एस.एस. चे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन कानिटकर यांनी केले. कार्यक्रम संपन्न होण्यास संस्थेच्या प्र. संचालिका डॉ सौ. एल.एस. आडमुठे यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.