no images were found
भाजपाच्या वतीने आणि बाणी मध्ये तुरुंगवास भोगलेल्या सन्माननिय व्यक्तींचा सन्मान
कोल्हापूर : 25 जून 1975 आणीबाणी स्वातंत्र्यानंतर अवघ्या 28 वर्षांनी काँग्रेसच्या निर्णयामुळे देशाला आणीबाणीच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. भारताच्या इतिहासातील हा काळा दिवस मानला जातो. इंदिरा गांधी यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 352 अन्वये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती. जी देशातील पहिली राष्ट्रीय आणीबाणी होती. यावर्षी या घटनेला आजरोजी 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.
आज या विषयाला अनुसरून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष विजय जाधव व प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या उपस्थितीमध्ये बिनखांबी गणेश मंदिर येथील मंगलधाम कार्यालयामध्ये आणिबाणी प्रसंगी तुरुंगवास भोगलेल्या सन्माननिय व्यक्तींचा शाल, पुष्पगुछ देऊन सत्कार सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी लोकतंत्र सेनानी संघाचे प्रमुख प्र.द तथा भाऊसाहेब गणपुले यांनी आणीबाणी काळातील घडलेल्या अनेक प्रसंगांचा उल्लेख करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. याचबरोबर लोकतंत्र सेनानी संघाच्यावतीने मिसा बंदिच्या मानधनात वाढ करावी, मिसा बंदिना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा द्यावा अशी मागणी याप्रसंगी केली.
आणिबाणीच्या काळात हजारो लोकाना तुरुंगात डांबले, अनेकांवर अमानुष अत्याचार आणि तुरुंगामध्ये टाकलेल्या लोकांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला होता. मुद्रण तसेच व्यक्ति स्वातंत्र्य हिरावून घेऊन देशात दडपशाही निर्माण करण्यात आली होती. इंदिरा गांधी यांच्या या जुलमी आणिबाणी बद्दल भाजपाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
आणिबाणीचा इतिहास युवा पिढीला समजण्यासाठी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देणार असल्याचे यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव व प्रदेश सचिव महेश जाधव यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रमोद जोशी, बाळासाहेब शिखरे, विलास जाधव, अभय कुलकर्णी, दिगंबर पाठकर, अशोक फडणीस, विद्याधर काकडे, श्रीमती अनू लिमये, कृष्णात शिंदे, विजय देवळे, आपटे, जोगळेकर, मोहन वादवाने यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी गायत्री राऊत, डॉ. राजवर्धन, हेमंत आराध्ये, विराज चिखलीकर, राजू मोरे, राजसिंह शेळके, रमेश दिवेकर, विशाल शिराळकर, गिरिष साळोखे, महादेव बिरंजे आदि उपस्थित होते.