no images were found
डॉ. चंद्रकांत लंगरे यांची लंडन येथील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी निवड
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील इंग्रजी आधिविभागातील सहयोगी
प्राध्यापक डॉ. चंद्रकांत लंगरे यांची लंडन (इग्लंड) येथील जोसेफ कॉनरॅड सोसायटी युके यांनी दिनांक 04 जुलै ते 06 जुलै, 2024 या कालावधीत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी निवड झाली आहे. ते सदरच्या चर्चासत्रात ‘नॉनफिक्शन ऑफ जोसेफ कॉनरॅड अॅण्ड रविंद्रनाथ टागोर ए स्टडी ऑफ नॅशनॅलिस्टीक कॉनफ्लिकट्स अॅण्ड ह्युम्यानिझम’ हा शोधनिबंध सादर करणार आहेत. डॉ. लंगरे यांनी जगप्रसिद्ध कादंबरीकार जोसेफ कॉनरॅड यांच्या कादंबरीवर आपले पीएच.डी.चे संशोधन केले आहे. तसेच या लेखकाच्या साहित्यकृतीवर त्यांनी यापूर्वी इटली, इग्लंड आणि पोलंड या देशातील नामवंत विद्यापीठात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात आपले शोधनिबंध सादर केले आहेत. तसेच सध्या ते जोसेफ कॉनरॅड यांच्या शंभराव्या पुण्यतिथीचे औचित्य साधून अमेरिकेतील युनिव्र्व्हसिटी ऑफ नॉर्थ टेक्सास् येथील नामवंत लेखक व समिक्षक प्रा. जॉन पिटर्स यांच्या सोबत जोसेफ कॉनरॅड यांच्या साहित्यकृतीवर दोन वैश्विक ग्रंथांचे संपादन करीत आहेत. त्यांना शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. डी. टी. शिर्के, प्र.-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रभंजन माने आणि सहकारी यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. या चर्चासत्रासाठी ते लवकरच लंडनला रवाना होत आहेत.