no images were found
बी. ए. फिल्म मेकिंग कोर्सचे डॉ. शिवाजी जाधव समन्वयक
कोल्हापूर(प्रतिनिधी): प्रतिनिधी शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. शिवाजी जाधव यांच्याकडे बी. ए. फिल्म मेकिंग या अभ्यासक्रमाचे समन्वयकपद देण्यात आले आहे. कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी नुकतेच हे निर्देश दिले.
कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी डॉ. जाधव यांना नुकतेच समन्वयक पदाचे पत्र सुपूर्द केले. या नियुक्तीसाठी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांचे सहकार्य झाले.
शिवाजी विद्यापीठात प्रथमच चित्रपटाशी संबंधित बारावीनंतर तीन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम सुरू झाला आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. जाधव यांची या अभ्यासक्रमाच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. जाधव यांना पत्रकारितेचा 16 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेशी संबंधित त्यांची आठ पुस्तके प्रकाशित आहे. सध्या ते एम. ए. मास कम्युनिकेशन कोर्सचे समन्वयक आहेत. शिवाय पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचेही ते समन्वयक आहेत. शिवाजी विद्यापीठात लवकरच सुरू होत असलेल्या कम्युनिटी रेडिओचेही ते नोडल ऑफिसर आहेत.