
no images were found
सलमानची तोडलेली ‘नो किसींग पॉलिसी’?
सलमान खानने ‘मैने प्यार किया’ रोमँटिक लव्हस्टोरी सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर त्याने ‘साजन’,’हम आपके है कौन’ सारख्या काही प्रेमकहाण्यांमध्येही काम केलं. सलमानने कधीच ऑनस्क्रीन किसींग सीन दिला नाही असाच अनेकांचा समज आहे. कारण त्याने सुरुवातीपासूनच ‘नो किसींग पॉलिसी’ फॉलो केली. पण अशी एक अभिनेत्री आहे जिच्यासोबत सलमानने या पॉलिसीचं उल्लंघन करत किसींग सीन दिला होता. कोण आहे ती अभिनेत्री आणि कोणता होता तो सिनेमा?
सध्या एक फोटो व्हायरल होतोय. सलमानच्या जुन्या लूकमधला हा फोटो आहे. म्हणजेच त्याच्या ९० दशकातील सिनेमाचा हा फोटो आहे. यामध्ये सलमान एका अभिनेत्रीला kiss करताना दिसतोय. हा सिनेमा आहे ‘जीत’ आणि ही अभिनेत्री कपूर घराण्याची मोठी मुलगी करिश्मा कपूर आहे. त्यांच्या किसींग सीनचा स्क्रीनशॉट आता व्हायरल होत आहे. सलमान आणि करिश्माने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. त्यापैकी ‘जीत’मध्ये त्याने हा किसींग सीन दिला होता.
या फोटोवर अनेकांनी कमेंट करत वेगळं मत दिलं आहे. ते खरोखर किस करत नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. तर काहींनी ‘हे खरं आहे का?’ असं विचारत आश्चर्य व्यक्त केलं आहे.2017 मध्ये ‘टायगर जिंदा है’च्या शूटिंगवेळी दिग्दर्शक अली अब्बास जफरने सलमानला ऑनस्क्रीन किस करण्यास सांगितले होते. पण तेव्हाही सलमानने स्पष्ट नकार दिला होता. तेव्हा दिग्दर्शकाने त्याचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला पण सलमान आपल्या पॉलिसीवर ठाम राहिला होता.