no images were found
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
कोल्हापूर : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक 10 जून ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) कोर्स क्र. 63 आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे दि. 4 जून 2024 रोजी मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.
मुलाखतीस येताना उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (DSW) यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील (CDS) कोर्स क्र. 63 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
सी.डी.एस. (CDS) वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावे. उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, उमेदवार लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात येणा-या सी.डी.एस. (CDS) या परिक्षेतकरिता ऑनलाईनव्दारे अर्ज केलेला असावा.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी: training.petenashik@gmail.com व दुरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉटस्ॲप क्र. 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क साधावा, असेही ले. कर्नल डॉ. चवदार यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.