
no images were found
कोल्हापूर विभागाचा बारावीचा निकाल ९४.२४ टक्के
राज्यात कोल्हापूर विभाग चौथ्या स्थानावरज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी कोल्हापूरमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इ.१२ वीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ९४.२४ टक्के आहे. विभागांतर्गत कोल्हापूर जिल्हा उत्तीर्णतेच्या टक्केवारीमध्ये अग्रस्थानी आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल ९५.६६ टक्के, सातारा जिल्ह्याचा निकाल ९३.६३ टक्के तर सांगली जिल्ह्याचा निकाल ९२.६८ इतका आहे. राज्यात कोल्हापूर विभाग राज्यात चौथ्या स्थानावर आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांत मिळून ८६१ कनिष्ठ महाविद्यालयातील १७५ केंद्रावर परीक्षा झाली होती. बारावीच्या परीक्षेसाठी तीन जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ७७ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती यापैकी एक लाख १४ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ७ हजार ७४१ इतकी आहे. कोल्हापूर विभागाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.२४ टक्के इतकी आहे अशी माहिती कोल्हापूर विभागाचे सचिव सुभाष चौगुले यांनी दिली.या परीक्षेत अकरा विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे सिद्ध झाले. या अकरा विद्यार्थ्यांची फेब्रुवारी- मार्च २०२४ परीक्षेतील त्यांनी केलेल्या गैरमार्गाच्या विषयाची संपादणूक रद्द करण्यात आली आहे.यंदाच्या बारावीच्या निकालाची वैशिष्ट्ये सांगताना विभागीय सचिव सुभाष चौगुले म्हणाले, कोल्हापूर विभागात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या पेक्षा ५.२३ टक्के अधिक आहे. कोल्हापूर विभागात यंदा ६०५३८ मुलांनी परीक्षा दिली होती त्यापैकी ५५ हजार ५६६ मुले उत्तीर्ण झाले आहेत मुलांच्या उत्तीर्ण तेचे प्रमाण ९१.७८ टक्के आहे. तर ५३७८१ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५२ हजार १७५ मुली उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.१ टक्के आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४९४९३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती यापैकी ४९२१० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ४७०७६ विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची उत्तीर्णतेची टक्केवारी ९५. ६६ टक्के आहे. सातारा जिल्ह्यात ३४०४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३३७१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ३१०६३७ इतकी आहे. सातारा जिल्ह्याच्या उत्तीर्ण टक्केवारी ९३.६३ टक्के इतकी आहे. सांगली जिल्ह्यातील ३१०५४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती यापैकी ३१०३२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ३९०२८ इतकी आहे. सांगली जिल्ह्याचे उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.६८ टक्के आहे.या पत्रकार परिषदेला विभागाचे सहसचिव डी.एस.पोवार, एस.बी.चव्हाण, प्रभारी शिक्षण उपसंचालक स्मिता गौड, शिक्षणाधिकारी आर.एम.लोंढे, उपशिक्षणाधिकारी तेजस ढमरे, वरिष्ठ अधीक्षक मनोज शिंदे, दीपक पोवार, सुधीर हावळ लेखाधिकारी एल.डी.पाटील, आदी उपस्थित होते.