no images were found
शिवाजी विद्यापीठच्या गुणवंत खेळाडूंचा गुण गौरव समारंभ“कलर अवार्ड” उत्साहात
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण अधिविभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील गुणवंत खेळाडूंचा गुण गौरव समारंभ शाहू सिनेट सभागृह येथे आज आयोजित करण्यात आला होता. सदर समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा डॉ डी. टी. शिर्के सर होते तर प्र कुलगुरु प्रा डॉ पी. एस. पाटील व कुलसचिव डॉ व्ही. एन. शिंदे , व्यवस्थापन सदस्य डॉ व्ही. एम. पाटील डॉ रघुनाथ धमकले ,डॉ पी टी गायकवाड प्रमुख उपस्थित होते.क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व क्रीडा कामगिरी चे अहवाल वाचन प्रा डॉ शरद बनसोडे यांनी केले. विद्यापीठाच्या १८ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधे सहभाग घेतला होता . ७ खेळाडूंना महाराष्ट्र राज्याचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झाले. लगभग दहा हजार खेळाडूंनी सांगली , सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातून विद्यापीठाचा विभागीय आणि आंतर वभागीय स्पर्धेमधे सहभाग घेतला होता . ८७४ खेळाडूंनी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व आंतर विद्यापीठ , खेलो इंडिया, आणि क्रीडा महोत्सव स्पर्धेमधे केला. देशाची मानबिन्दु असलेली ऍथेलेटिक्सची जनरल चैम्पियनशिप सह ७ क्रीडा प्रकारामध्ये विद्यापीठाच्या संघांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले . खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स मधे २०५ सहभागी झालेल्या विद्यापीठांमध्ये शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्रात पहिले आणि देशात १३ स्थान मिळविले . महाराष्ट्रराज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव मधे ३रे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. त्यामधे एथलेटिक्सची पुरुष व महिला दोन्हीगटाची जनरल चैम्पियनशिप मिळवली असे अहवाल सादर केले. त्यानंतर उपस्थित खेळाडू विद्यार्थी यांना कुलसचिव डॉ व्ही. एन. शिंदे यांनी खेळाडू विद्यापीठाचा नावलौकिक वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात व त्यांची खेलाप्रती असणारी जिद्द याचे कौतुक केले. त्यानंतर प्र कुलगुरु प्रा डॉ पी. एस. पाटील यांनी येणाऱ्या कालावधीत विद्यापीठ खेळाडूंसाठी स्पोर्ट्स एक्सेलेन्स सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे असे नमूद केले.
अध्यक्षयी भाषणात कुलगुरु प्रो डॉ डी. टी. शिर्के सर यांनी खेळाडूना मार्गदर्शन करताना विद्यापीठ मार्फत खेळाडूंना ज्या सुविधा दिल्या जातात त्या देण्यासाठी विद्यापीठाचे अधिकार मंडल सुद्धा मोलाचे सहकार्य करते व येणाऱ्या कालावधीत खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यासाठी विद्यापीठ कटिबध्द आहे अशी ग्वाही दिली व पुरस्कार मिळवल्याबद्दल खेळाडूंचे अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अधिकार मंडळाने रू १५,७२,०००/- जागतिक रॅग्बी आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झालेल्या ६ ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी तात्काळ मंजुरी दिल्याचा उल्लेख केला आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण अधिविभागाचे कौतुक केले.कलर अवार्ड कार्यक्रमामधे एकूण १९० खेळाडू आणि २० प्रशिक्षकांचा ब्लेझर ,प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
यंदाच्या वर्षी सुद्धा सर्वोत्कृष्ट कॉलेज चा बहुमान क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर ट्रॉफी द न्यू कॉलेज कोल्हापूर यांनी मिळवली .सदर सत्कार स्वीकारण्यासाठी कॉलेज चे प्राचार्य डॉ व्हि. एम. पाटील, डॉ रघुनाथ धमकले, प्रा अमर सासाने व खेळाडू उपस्थित होते.सदर कार्यक्रमांमध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ व खेलो इंडिया स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचे व संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक यांचे सत्कार कुलगुरु प्रा डॉ डी. टी. शिर्के सर,प्र कुलगुरु प्रा डॉ पी. एस. पाटील,कुलसचिव डॉ व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण डॉ शरद बनसोडे यांचा कुलगुरू यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रभारी संचालक, विद्यार्थी विकास डॉ. पी.टी. गायकवाड यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ प्रशांत पाटील , प्रा किरण पाटील, डॉ आकाश बनसोडे यांनी केले. सदर कार्यक्रमास मोठी संख्यामध्ये शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शारीरिक शिक्षण संचालक, खेळाडू, पालक व पत्रकार उपस्थित होते.