Home शासकीय महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

2 second read
0
0
31

no images were found

महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.या परीक्षेमध्ये बुलढाणा जिल्याह्यातील तुषार विठ्ठल वाघ हे खुल्या व मागासवर्गवारीत राज्यातून प्रथम आले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्याह्यातील सायली सातप्पा फासके ह्या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.
उमेदवारांच्या माहितीसाठी निकाल व प्रत्येक प्रवर्गाकसाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण(Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. अंतिम निकालात अर्हताप्राप्त , शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण &…