no images were found
डीपी वर्ल्डचे गोव्यात नवीन गोदाम, वेअरहाऊसिंग क्षेत्रात केला पाया बळकट
मुंबई – डीपी वर्ल्ड या आघाडीच्या सप्लाय चेन क्षेत्रातील कंपनीने गोव्यात गोदाम (Warehouse) उभारले आहे, लोट्युलिम येथे हे गोदाम उभारण्यात आले असून ते मोरमुगाओ बंदरापासून ३१ किमी तर दाबोलिम विमानतळापासून २३ किमी तर पणजी शहरापासून २५ किमी अंतरावर आहे. हे ग्रेड ए दर्जाचे गोदाम असून ते सुरक्षेच्या सर्व बाबी लक्षात ठेवून उभारण्यात आले आहे. गोवा-बंगलोर- पुणे महामार्गाही या गोदामाच्या अगदी जवळून जातो. या गोदामात रसायन आणि हेल्थकेअर कार्गो ठेवण्यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
हे गोदाम तीन गोदींवर आहे आणि त्यात २६२० पॅलेट पोझिशन्स आहे. हे गोदाम २७५१२ चौ.फुट इतक्या परिसरात वसले आहे आणि तिथे रासायनिक उत्पादनं ठेवता येतील. ही जागा अत्यंत सुरक्षित आहे. त्यात एक पंप रूम, अग्निशमन व्यवस्था, छपरावर रॉकवूल इन्सुलेशन, आणि बाजूच्या भिंतींना बबल रॅप इन्सुलेशन आहे. हवेचा दर्जा आणि सर्व कामगारांच्या सुरक्षेसाठी दर तासाला सहावेळा फिल्टरच्या मदतीने हवा बदलण्याचे काम होते. सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी एक निवासी सुरक्षा अधिकाऱ्याचीही नेमणूक करण्यात आली आहे.
गोव्यातील या नव्या गोदामाबद्दल बोलताना डीपी वर्ल्ड सबकॉन्टिनेंट चे कॉन्ट्रॅक्ट लॉजिस्टिक्स अँड कोल्ड चेन सोल्यूशन्सचे प्रमुख अनुप चौहान म्हणाले, “डीपी वर्ल्डमध्ये आम्ही इंटीग्रेटेड मल्टी मॉडेल सप्लाय चेन नेटवर्क उभारून ग्राहकांना व्यापारासाठी अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. गोव्यातील या आमच्या गोदामामुळे आमचं वाढत असलेलं वेअरहाऊसिंग नेटवर्क आणखी सशक्त होईल आणि या प्रदेशातील ग्राहकांना सप्लाय चेनचा अधिकाधिक चांगला अनुभव येईल. या गोदामात गोदाम व्यवस्थापनाच्या अत्याधुनिक सिस्टिम्स आहेत. त्यामुळे देशभरातील ग्राहक विविध बाजारपेठांशी जोडले जातील आणि त्यामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर उद्योगांमध्ये वाढ होईल.”
डीपी वर्ल्डचं भारतातलं गोदामांचं जाळं पन्नास लाख चौ.फुटांवर आणि ६० ठिकाणी पसरलं आहे. लोट्युलिम मधील रासायनिक वस्तु व्यापाऱ्यांना साठवुणकीला स्वच्छ आणि मोठी जागा मिळेल. तसंच फॅसिलिटी डिझाईन आणि डेव्हलपमेंट, सेकंडरी डिस्ट्रिब्युशन सर्व्हिसेस, वस्तुंच्या वाहतुकीवर लक्ष ठेवता येईल तसंच विविध कागदपत्रांची पूर्तता, अहवाल आणि डॅशबोर्डच्या माध्यमातून उपलब्ध साठ्याचीही माहिती मिळेल. तसंच डीपी वर्ल्डच्या लॉजिस्टिक्स सोल्युशन्स मुळे गोवा आणि गोव्याच्या पलीकडेही माफक दरात सप्लाय चेन अधिकाधिक प्रभावी होईल.