Home सामाजिक राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीरासाठी जेवण व अल्पोपहारासाठी दरपत्रक सादर करावेत

राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीरासाठी जेवण व अल्पोपहारासाठी दरपत्रक सादर करावेत

1 second read
0
0
54

no images were found

राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीरासाठी जेवण व अल्पोपहारासाठी दरपत्रक सादर करावेत

 

कोल्हापूर : महाराष्ट्र बँटरी एन.सी.सी. ऑफिस कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीर (क्र. 318) दिनांक 30 जुलै 2024 ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत एन.सी.सी. भवन, शिवाजी विद्यापीठ परिसर कोल्हापूर व शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर येथे प्रशिक्षण शिबीर (क्र. 333) दि. 8 नोव्हेंबर 2024 ते 17 नोव्हेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबीराचा कालावधी, उपस्थित संख्या व इतर माहितीनुसार लागणारे जेवण व अल्पोपहार मापक दरात पुरविण्यासाठी इच्छुक भोजन व अल्पोपहार पुरवठादारांनी आपले दरपत्रक बंद लिफाफा करून दिनांक 15 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत समादेशक अधिकारी 1 महाराष्ट्र बैटरी एन.सी.सी. ऑफिस, एन.सी.सी. भवन, सम्राट नगर कोल्हापूर येथे सादर करावेत, असे आवाहन समादेशक अधिकारी ले. कर्नल एम. सी. मुथंना यांनी केले आहे.

नमुद कालावधीत भोजन व अल्पोपहार बाबतीत कमीत कमी दराने व चांगल्या प्रतीत पुरवठा करणाऱ्यासोबत करार करण्यात येईल. याबाबतीतील इतर सर्व अधिकार शिबीर प्रमुख यांच्याकडे राखून ठेवण्यात येतील. जेवण व अल्पोपहार यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच कार्यालयात उपलब्ध आहे. ज्यांना दर पत्रक सादर करावयाचे आहे त्यांनी दर पत्रक सादर करण्यापूर्वी जेवण यादी व अटी शर्ती व इतर माहिती घेवून दरपत्रक सादर करावेत. अधिक माहितीसाठी संपर्क दूरध्वनी क्र. 0231-2694580 वर संपर्क साधावा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…