no images were found
जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींनी मतदान करावे – संभाजी पोवार
कोल्हापूर: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने दि. 7 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान संपन्न होणार आहे. त्यानुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी कर्तिकेएन एस. हे 7 मे 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता पाचगाव, कोल्हापूर येथील मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांचे स्वागत करणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींनी उपस्थित राहून मतदान करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले आहे.
मतदानावेळी दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी उपस्थित राहणार आहे. दिव्यांग व्यक्तींना मतदान सुलभ व सोईस्कर होण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व वेळोवेळी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने दिव्यांग शाळेतील सर्व मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना भेट देवून व्हील चेअर उपलब्धतेबाबत तसेच रॅम्प व पिण्याच्या पाण्याची सोय याबाबत खात्री करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये दिव्यांग-अंध मतदार यांच्या साठी ब्रेल लिपीतील डमी मतपत्रिका व ब्रेल लिपीतील वोटर्स स्लिप (voters sleep) उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी मतदान करावे, असे आवाहनही श्री. पोवार यांनी केले आहे.