Home सामाजिक एशिया इंडो शिखर परिषद कोल्‍हापुरात 

एशिया इंडो शिखर परिषद कोल्‍हापुरात 

18 second read
0
0
131

no images were found

एशिया इंडो शिखर परिषद कोल्‍हापुरात 

कोल्‍हापूर : युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड, भारत व इंटरनॅशनल रिसर्च पब्लिकेशन ऑफ बिझनेस मॅनेजमेंट व  सहप्रायोजक न्‍यूज आखाडा कोल्हापूर यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने एशिया इंडो शिखर परिषद सन्मान सोहळा  रविवार दि. 19 मे 2024, रोजी सकाळी 10.30 वाजता, शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात यशाच्या उत्तुंग आभाळात आणखी नवी क्षितिजे काबीज करून आपल्या क्षेत्रात अलौकिक कार्य करण्याची प्रेरणा व उदंड शक्ती निर्माण करणाऱ्या निवडक सन्मानमूर्तींचा गौरव जेष्ठ अभिनेते टीव्ही कलाकार सुनील गोडबोले यांच्‍या शुभहस्‍ते करण्यात येणार आहे.  तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना इंडिया प्राईम आयकॉन अवॉर्ड, ग्लोबल अचिवर्स स्टार अवॉर्ड, द ग्रेट इंडिया स्टार अवॉर्ड, युनिव्हर्सल टॅलेंट बुक अवॉर्ड, नॅशनल एक्सलन्स स्टार अवॉर्ड, मीडिया आयकॉन अवॉर्ड, जागतिक पर्यावरण सामाजिक पुरस्कार, इन्स्पायरिंग लीडर अवॉर्ड , महाराष्ट्र प्राइड ऑफ स्टार अवॉर्ड , महात्मा गांधी राष्ट्रहित सेवा गौरव पुरस्कार , छ. शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार, महाराष्ट्र प्राइड ऑफ स्टार अवॉर्ड देवून सन्‍मानित करण्यात येणार आहे.  सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल पुणेरी पगडी / फेटा असे पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे.  7 मे पर्यंत नामांकन करावे, असे आवाहन संयोजक, समृद्धी प्रकाशन संस्‍थेचे अध्यक्ष, डॉ. बी. एन. खरात यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…