
no images were found
बॉलिवूड स्टार जान्हवी कपूरचं कधीही न पाहिलेलं घर आता होणार खुलं
मुंबई – आज एअर बीएनबीने आयकॉन्स नावाची योजना जाहीर केली आहे. यात संगीत, चित्रपट, टेलिव्हिजन, कला, क्रीडा आणि यासारख्या अनेक क्षेत्रातील लोकांच्या घरात रहायला मिळणार आहे. हे आयकॉन्स तुम्ही आतापर्यंत फक्त कल्पना केली असेल अशा त्यांच्या विश्वात तुम्हाला घेऊन जाणार आहेत. आता तुम्ही फेरारी म्युझियम मध्ये झोपू शकता, एखाद्या राजकुमाराच्या पर्पल रेन हाऊसमध्ये राहू शकता, आणि बॉलिवूड आयकॉन जान्हवी कपूरच्या समुद्रकिनारी वसलेल्या घरात एक दिवस व्यतित करू शकता. एअरबीएनबीवर आज आम्ही असे पहिले ११ आयकॉन आणणार आहोत. त्यामुळे या वर्षांत जगभर असे अनेक अनुभव तुम्हाला घेता येतील.
एअरबीएनबी इंडिया, दक्षिणपूर्व आशिया, हाँगकाँग, तैवान चे व्यवस्थापक अमनप्रीत बजाज म्हणाले, “आयकॉन्स असे जादुई आणि कल्पनातीत असणारे अनुभव देतात. आयकॉन्सच्या लाँचचा एक भाग म्हणून जान्हवी कपूर बरोबर या कॅम्पेनसाठी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या कॅम्पेनमुळे जान्हवीच्या समुद्र किनाऱ्यावरील घराची झलक बघायला मिळेल.” लाँचचा भाग म्हणून बॉलिवूड सुपरस्टार जान्हवी कपूर तिच्या चेन्नईच्या घराचे दरवाजे खुले करणार आहे. ही तिची कौटुंबिक मालमत्ता आहे असून हा अभूतपूर्व अनुभव असेल. पडद्यावर अतिशय कसदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या जान्हवीचं घर या प्रमोशनल कॅम्पेन अंतर्गत दोन पाहुण्यांसाठी खुलं करण्यात येणार आहे.
जान्हवीच्या घराबद्दल अधिक माहिती
जान्हवी सर्व पाहुण्यांचे स्वागत करणार असून ती पाहुण्यांना घर दाखवेल. घराच्या प्रवेशद्वारावर हाताने तयार केलेलं संगमरवरी शिल्प आहे. याबरोबरच आतल्या घराच्या भागात बांबू, वेत आणि संगमरवराने सजावट केली आहे. घराच्या हृदयस्थानी एक लिव्हिंग रुम आहे. तिथे अगदी नेमक्या वस्तू मांडल्या आहे. डायनिंग एरियामध्ये कुटुंबाच्या काही आठवणी जतन करून ठेवल्या आहेत. जान्हवीची ड्रेसिंग रुमही पहायला मिळेल. तिथे ती नैसर्गिक त्वचेसाठी ट्रीटमेंट घेते. घराला हवेशीर मास्टर बेडरुम आहे. घराच्या मागच्या बाजूला एक मोठी बाग आहे. तिथे पाम ची झाडं आणि कारंजे आहेत. एक महागडा स्विमिंग पूल आहे. एकूणच हा एक हवेशीर सेटअप आहे आणि रिलॅक्स होण्यासाठी तसंच मोकळ्या हवेत सूर्यास्त पाहण्यासाठी एक सुंदर जागा आहे.
“चेन्नईच्या घरात माझ्या कुटुंबाबरोबर घालवलेले क्षण ही माझ्यासाठी उन्हाळ्याची एक रम्य आठवण आहे. ही जागा मला कायमच एखाद्या अभयारण्यासारखी वाटत आली आहे. हे सगळं मला माझ्या फॅन्सबरोबर शेअर करायचं आहे म्हणून मी माझ्या घराचे दरवाजे एअरबीएनबीच्या माध्यमातून उघडले आहेत. आमच्या कुटुंबाच्या काही पारंपरिक गोष्टी एअरबीएनबीच्या पाहुण्यांबरोबर शेअर करण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. त्यामुळे पाहुण्यांना कपूर घराण्यासारखा या जागेचा आनंद घेता येईल. पूलजवळ बसून चिल करणे, योगा, माझ्या आईच्या नॅचरल स्कीन केअर रेसिपी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन आठवणी तयार करणे हे सगळं इथे येणारे गेस्ट करू शकतील. एअरबीएनबीच्या आयकॉन प्रवर्गात माझा समावेश केल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे आणि इथे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यास मी आतूर आहे.” असं जान्हवी कपूर म्हणाली.