no images were found
डीकेटीई टेक्स्टाईलच्या सात विद्यार्थ्यांची इन्सीजनीएन होम प्रा. लि. या नामंाकित कंपनीमध्ये निवड
इचलकरंजी (प्रतिनिधी): येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल मध्ये शिक्षण घेणा-या सात विद्यार्थ्यांची देशातील नामवंत इन्सीजनीएन होम प्रा. लि. या कंपनी मध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. मुंबई, ठाणे येथे डीकेटीईचे निवड झालेले सात विद्यार्थी विविध पदावर लवकरच रुजू होणार आहेत. काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांचे १०० टक्के क्वॉलिटी प्लेसमेंट व्हावे यासाठी डीकेटीई मार्फत वेळोवेळी कॅम्पस इंटरव्हयूचे आयोजन करण्यात येते.
इन्सीजनीएन होम प्रा.लि. ही फॅशन होम टेक्सटाईलमधील अघाडीची उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे. नॉटीका,रॉस,डोमनी कॅरेफोअर, लिनॉल, सिमन्स इ. त्यांचे जगप्रसिध्द ग्राहक आहेत. नामवंत कंपन्याद्वारे त्यांचे ऑडिट होवून त्यांना मानंकन देखील प्राप्त झाले आहे. दरवर्षी ही कंपनी डीकेटीईतील विद्यार्थ्यांच्या कॅम्पस निवडीसाठी येत असते. यावर्षी या कंपनीमार्फत आयोजित रिटन टेस्ट, पर्सनल इंटरव्हयूव अशा अनेक फे-यामधून विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमताची चाचणी घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांचे एकूणच शैक्षणिक गुणवत्ता यावरुन त्याची उत्तम पॅकेजसह निवड केली. सदर कंपनीमध्ये रसिका गुरव, प्रियंका कुंभार,ॠत्वीक फडतारे, देवल धोतरकर, मिताली कांबळे, अनुष्का चौगुले व अंकिता हासबे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
डिकेटीईमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणारे सॉफ्टस्कील प्रोग्रॅमस, देण्यात येणारे इंडस्ट्रीयल प्रशिक्षण, इंडस्ट्री भेटी, गेस्ट लेक्चर्स या सर्वांचा फायदा या विद्यार्थ्यांना होत असतो. सदर विद्यार्थ्यांस संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. प्रभारी संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, उपसंचालक डॉ. यु. जे. पाटील, ट्रेनिंग ऍण्ड प्लेसमेंट ऑफीसर प्रा.एस.बी. अकिवाटे याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.