no images were found
महापालिकेच्यावतीने जागतिक हिवताप दिन साजरा
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने आज जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. जागतिक हिवताप दिनानिमित्त सहाय्यक संचालक हिवताप डॉ. योगेश साळे, प्राचार्य कुटुंब कल्याण प्रक्षिण केंद्र शेंडा पार्क यांच्या उपस्थितीमध्ये नागरी आरोग्य केंद्र क्रं.7 आयसोलेशन येथे साजरा करण्यात आला. यावेळी हिवतापा विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक योजनांच्या अंबलबजावणीसाठी दरवर्षी विविध उपक्रमाद्वारे साजरा केला जातो. नागरिकांपर्यंत हिवतापाची माहिती पोचवण्याचा प्रयत्न करणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. हिवताप आजाराचा प्रसार एनोपेलीस जातीच्या डासांच्या मादी मार्फत होतो. हा आजार प्लाझमोडियम मलेरी व प्लाझमोडियम प्लाझमोडियम विवेक्स, प्लाझमोडियम ओवेल यापैकी आपल्याकडे प्लाझमोडियम, प्लाझमोडियम विवेक्स हे प्रामुख्याने आढळून येतात.
हिवताप आजाराची लक्षणे म्हणजे थंडी वाजणे, ताप येणे, डोके अंग दुखणे, थकवा येणे, झटके येणे, कोमात जाणे, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे, प्रसंगी मृत्यूही होऊ शकतो. हा आजार एनोपेलीस डासाचे मादीच्या चाव्यामुळे एका रूग्णापासून दुस-या निरोगी व्यक्तीस होतो. हा डास फक्त स्वच्छ पाण्यातच अंडीघालून पिल्लांना जन्म देतो. डासाचे जीवनचक्र हे अंडी, अळी, कोष, प्रौढ डास या चार अवस्थेतून जाते. हे पूर्ण होण्याकरिता आठ ते दहा दिवस लागतात. हे जीवनचक्र थांबवून डास निर्मिती कमी करणे शक्य आहे.
यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्वच्छ पाणीसाठे जसे की घरातील वापरासाठी ठेवलेले हौद, रांजण, टीप, पाण्याची टाकी आठ दिवसांतून एकदा स्वच्छ घासून पुसून कोरडे करून नंतर दुसरे दिवशी पाणी भरावे. पाणीसाठे घट्ट झाकून ठेवावे त्यामुळे डासाना पाण्यापर्यंत जाता येणार नाही. मोठे पाणीसाठे असतील तर त्यामध्ये गप्पी मासे सोडावेत. तुंबलेली गटारे, पाण्याचे डबके इत्यादीमध्ये तेल टाकावे. त्यामुळे डास निर्माण होणार नाहीत. घरातील कूलर, फ्रीजमधील पाणी सतत बदलावे. शौचालयाच्या पाइपला जाळी बांधली. परिसरात घराच्या छतावर रिकामे टायर, फुटके डबे, बाटल्या नारळाच्या करवंटया इत्यादीमध्ये पाणी साठवून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पक्षांना पिण्यासाठी ठेवलेले पाणी, झाडाचे कुंडीतील पाणी सतत बदलावे त्यामुळे डास होणार नाही. घरामध्ये मच्छरदाणीचा वापर करावा, पूर्ण अंग भरून कपडे वापरावे, घरात खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. घरात सीताफळ, कडूलिंब पाल्याचा धूर करावा. विविध क्वाईल क्रिमचा वापर करावा. सकाळी व संध्याकाळी सहा वाजता दरवाजे खिडक्या बंद कराव्यात.
या कार्यक्रमावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, आरोग्यधिकारी डॉ प्रकाश पावरा, वैदयकिय अधिकारी डॉ.अर्पिता खैरमोडे, डॉ.विजय मुसळे, डॉ.निखिल पाटील, डॉ.आरती बिराजदार, नितीन जाधव, संजय खोत, नागरी आरोग्य केंद्र व आयसोलेशन हॉस्पिटलकडील सर्व स्टाफ उपस्थित होता.