no images were found
स्वच्छता मोहिमेमध्ये सर्वांनी मिळून एकत्रित काम करुया – राहूल रोकडे
कोल्हापूर :- स्वच्छता मोहिमेमध्ये सर्वांनी मिळून एकत्रित काम करुया यासाठी सर्व सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे, नाले सफाईमध्ये आपल्या काही सूचना असतील तर त्या दयाव्यात असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राहूल रोकेडे यांनी आज केले. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात नालेसफाई व स्वच्छता मोहिमेच्या अनुषंगाने विविध सेवाभावी संस्था, नोडल अधिकारी व सर्व आरोग्य निरिक्षक यांची संयुक्त बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी
अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी यावेळी शहरात स्वच्छतेच्या अनुषंगाने मुख्य आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक यांनी भागामध्ये दैनंदिन फिरती करुन कचरा उठाव करावा. नागरीकांनी अथवा कर्मचा-यांनी कचरा जाळल्यास दंडात्मक कारवाई करा. सर्व भागामध्ये कचरा संकलनासाठी ॲटो टिप्पर वेळत पोचल्या पाहिजेत. ॲटो टिप्परवर निवडणूकीच्या जनजागृतीसाठी ऑडीओ क्लीप लावाव्यात. बदली कर्मचारी फिरतीवेळी सापडलेस संबंधीत आरोग्य निरिक्षक व मुकादमवर कारवाई होणार. ड्रेनेज क्लीनिंगसाठी सांगलीवरुन मोठे जेट मशिन येणार आहे. यासाठी प्रामुख्याने ड्रेनेज सफाईचे नियोजन करा अशा सूचना दिल्या. तसेच पावसाळयापुर्वी महापालिकेच्यावतीने नाले सफाई सुरु आहे. या नाले सफाईची नोडल अधिका-यांनी वेळोवेळी पाहणी करुन विभागीय कार्यालयात सफाईसाठी समन्वय ठेवावा. काढलेला कचरा तातडीने उठाव करावा. नाले सफाईबाबत सेवाभावी संस्थांनी त्यांची काही सूचना असतील तर त्यांनी ती महापालिकेला दयावीत. नागरीकांमध्ये महापालिकेबरोबर सेवाभावी संस्थांनी जनजागृती करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी काही सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी नागरिकांनी उघडयावर कचरा टाकल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. विविध संस्थाच्या माध्यमातून 260 रविवार स्वच्छतेचे काम सुरु आहे. यामध्ये सर्वांचा सहभाग वाढावा. ई कचरा व जुने फोटो स्विकारण्यासाठी आठवडयातून एक दिवस निश्चित करावा. यासाठी महापालिकेने गाळा उपलब्ध करुन दिला आहे. लवकच त्या ठिकाणी कलेक्ट सेंटर सुरु करण्यात येईल. या सेंटरला नागरीकांनी सहकार्य करावे. काही दुकानदारांनी दुकानाच्या दारामध्ये गटारीवर फरशा घालून गटारी बंदिस्त केल्या आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचा-यास स्वच्छता करता येत नाही. अशी बंदिस्त गटारी स्वच्छतेसाठी ओपन करावीत. यासाठी संबंधीत दुकानदारांना नोटीसा काढाव्यात. विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एक किंवा दोन कचरा संकलन केंद्र सुरु करा. जेणेकरुन त्या क्षेत्रातील प्रभागातील कचरा एकत्र संकलन करता येईल. ओला व सुका कचरा स्वतंत्र घ्यावा अशा सूचना केल्या.
यावेळी उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुनिल काटे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, वरिष्ठ लेखापरीक्षक वर्षा परीट, अधीक्षक एम के मधाळे, शेल्टर संस्थेच्या मेघा लोंढे, महादेव कांबळे, मनोज्ञा कुलकर्णी, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, स्वच्छता दूम अमित देशपांडे, अवनि संस्थेच्या वनिता कांबळे, स्नेहल जाधव, विभागीय आरोग्य निरिक्षक व आरोग्य निरिक्षक उपस्थित होते.