no images were found
डीकेटीई राजवाडयामध्ये गुढीपाडव्यानिमित्त ‘स्वरप्रभात-गीत वानरायण‘ कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न
इचलकरंजी (प्रतिनिधी) : डीकेटीईच्या राजवाडयामध्ये गुढीपाडव्यानिमित्त पहाटेचा ‘स्वरप्रभात-गीत वानरायण‘ हा खास बहारदार मराठी गीतांचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम डीकेटीई, आपटे वाचन मंदीर व पं.बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर केलेला होता.
१९५५-५६ या वर्षभरात आकाशवाणावरुन ग.दी.माडगुळकरांनी रचलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबदध केलेले गीतरामायण खूप गाजले. गीतवाणरायण ही तशीच ५६ गीतांची स्वतंत्र निर्मिती आहे व ती पूर्णपणे वाल्मिकी रामायणवर आधारीत असून वानरांची रामायणातील भूमिका मांडणारी आहे. सदर रचना व निर्मिती ही डीकेटीईचे प्रा. सचिन कानिटकर यांचीच असलेने डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी डीकेटीईच्या सुप्रसिध्द स्वरप्रभात या कार्यक्रमात गीतवानरायण या नव्या रचनेची भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानुसार हे सादरीकरण झाले.
कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलानाने पहाटे ४.३० वा तीन्ही संस्थेच्या पदाधिका-यांच्या हस्ते झाली. जितेंद्र कुलकर्णी यांनी परंपरेनुसार राग भटीयार सादर केला आणि त्यानंतर वानरांच्या भावभावना व पराक्रम सांगणारी १४ गीते सादर करण्यात आली. प्रतिथयश कलाकार गौरी पाटील, श्रध्दा सबनीस, स्मीता कुलकर्णी, विकास जोशी, शिवाजी लोहार, सौरभ पांणदारे, यांनी गानसेवा सादर केली. केदार गुळवणी, प्रशांत देसाई, पृथ्वीराज पाटील, संग्राम कांबळे, रमजान बालेखान, लक्ष्मण पाटील यांनी साथ दिली. संपूर्ण संगीत संयोजन लक्ष्मण पाटील यांनी केले. राहूल जगताप, विजय माळी, प्रितम पाटील यांच्या सवे कर्मचा-यांनी अप्रतिम नेपथ्य उभे केले होते. कार्यक्रमातील हानुमान व वानरे लक्षवेधक होती तर संजय काशीद यांची हनुमानाची वेशभुषा सर्वांचे लक्ष वेधत होती. संपूर्ण राजवाडयाला अकर्षक रोषणाई करण्यात आली होती. यानंतर उत्कृष्ठ वेशभूशांना विविध पारितोषीके देण्यात आली.
सदर कार्यक्रमास डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, ट्रस्टी डॉ राहुल आवाडे, सर्जेराव पाटील, रवी आवाडे, डीकेटीईच्या प्र. संचालिका डॉ एल.एस.आडमुठे, सरोजनी होसकल्ले, द्राक्षयणी पाटील, मौश्मी आवाडे, रेवती आवाडे, बाळकृष्ण बुवा चे उमेश कुलकर्णी, आपटे वाचन मंदीर चे सुषमा दातार, डॉ कुबेर मगदुम, डॉ सुजित सौंदत्तीकर जवाहरचे एमडी मनोहर जोशी यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, नागरिक, संगीत श्रोते मोठया संख्येने उपस्थित होते.