Home मनोरंजन बिग बींमुळे परवीन- डॅनी या जोडीचा ब्रेकअप ?

बिग बींमुळे परवीन- डॅनी या जोडीचा ब्रेकअप ?

0 second read
0
0
25

no images were found

बिग बींमुळे परवीन- डॅनी या जोडीचा ब्रेकअप ?

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या फिल्मी करिअरपेक्षा पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येत असतात. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे परवीन बाबी .कलाविश्वातील अनेक अभिनेत्यांसोबत तिचं नाव जोडलं गेलं. मात्र, यात अभिनेता डॅनी डेन्झोपा यांच्यासोबतचं तिचं नातं बरंच चर्चेत राहिलं. परंतु, अमिताभ बच्चन यांच्यामुळे परवीन आणि डॅनी यांचा ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जातं.
सध्या सोशल मीडियावर डॅनी यांची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. त्यांनी ही मुलाखत फिल्मफेअरला दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी परवीन बाबी यांच्यासोबतच्या नात्यावर भाष्य केलं. इतकंच नाही तर ब्रेकअपचा किस्सा सांगत त्यांनी अमिताभ बच्चन यांचाही उल्लेख केला.काय म्हणाले होते डॅनी?जवळपास ४ वर्ष मी आणि परवीन एकमेकांना डेट करत होतो. आम्ही एकमेकांच्या घरीदेखील जायचो. त्यापूर्वी अमिताभ बच्चन आणि महेश भट्ट यांच्यासोबतही परवीनच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, तो काळ आम्ही दोघांनीही खूप चांगल्या प्रकारे घालवला. मात्र, त्यानंतर परवीन बाबीला पॅरानॉयड सिजोफ्रेनियाचा त्रास होऊ लागला. परंतु, त्याची पुसटशी कल्पनाही मला नव्हती, असं ते म्हणाले.
पुढे ते म्हणतात, “मी आणि अमिताभ एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो. ही गोष्ट जेव्हा परवीनला कळली त्यावेळी तिला धक्काच बसला होता. एक दिवस मी असाच तिच्या घरी गेलो तर तिने दरवाजा उघडायला नकार दिला. इतकंच नाही तर, निघून जा तू इकडून..तू अमिताभचा एजंट आहेस असं ती म्हणाली. त्या दिवसानंतर आमचं नात कायमचं तुटलं.”
दरम्यान, त्याकाळात डॅनी यांच्यापूर्वी परवीन, अमिताभ यांना डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. या जोडीने ‘मजबूर’, ‘शान’, ‘दिवार’ अशा जवळपास ८ सिनेमांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली होती.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…