
no images were found
अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; ? महाराष्ट्राचा हवामान अंदाज
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राजधानी दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशात अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
26 मार्चला जम्मू-काश्मीर, लड्डाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशमध्ये विजांच्या कटकडाटासह पावसाची शक्यता आहे. बर्फवृष्टीचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम बंगाल आणि सिक्किमच्या अनेक भागांमध्ये 25 ते 26 मार्चदरम्यान हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मेघालयमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बिहार आणि झारखंडमध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास महाराष्ट्रात हवामान कोरडं राहणार असून, किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.