no images were found
नीना मेस्त्री नाईक यांची निवेदनशैली अजरामर: रवींद्र ओबेरॉय; पत्रकारिता व जनसंवाद विभागात आदरांजली
कोल्हापूर( प्रतिनिधी): आकाशवाणीच्या ज्येष्ठ निवेदिका नीना मेस्त्री-नाईक यांच्या आवाजात जादू होती. शब्दांत भावना ओतण्याची कला त्यांना अवगत होती. त्यांची निवेदनशैली अजरामर राहिल, असा विश्वास ज्येष्ठ उद्योजक रवींद्र ओबेरॉय यांनी व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागात नीना मेस्त्री नाईक यांना अभिवादन करण्यासाठी शोकसभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर आकाशवाणी केंद्राचे संचालक डॉ. सुनिल गायकवाड होते.
यावेळी पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार, मराठी विभागातील ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, निवृत्त शिक्षणाधिकारी आणि लेखक डॉ. वसंत गायकवाड, वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, नीना मेस्त्री यांचे पती अरूण नाईक, कन्या तन्वी नाईक, विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे, जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, आरजे मनीष आपटे, सांगली येथील आरजे ओंकार, संजय घोडावत विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख जयप्रकाश पाटील, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीहरी देशपांडे, तेजस्विनी देसाई, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. प्रसाद ठाकूर आदींनी नीना मेस्त्री-नाईक यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.
नीना मेस्त्री-नाईक यांनी तीस वर्षे आकाशवाणीत काम केले. या काळात त्यांनी अनेक लेखक, अभ्यासकांच्या मुलाखती घेतल्या. अनेक कादंबर्यांचे अभिवाचन केले. नवख्या लेखकांना आकाशवाणीचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी सतत मार्गदर्शन केले. त्यांची उणीव सर्वांनाच भासेल, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर आणि सांगली येथील महेश कराडकर यांनी पाठवलेल्या शोक संदेशाचे वाचन आरजे प्राजक्ता शहा हिने केले.
प्रारंभी नीना मेस्त्री नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. दोन मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.