no images were found
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी मोफत उद्योजकता व तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर: संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. व लिडकॉम, मुंबईद्वारे पुरस्कृत चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, मोची, होलार प्रवर्गातील) युवक-युवती, महिला व नव उद्योजकांकरिता मोफत उद्योजकता व तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,(एमसीइडी) कोल्हापुरद्वारे करण्यात येत आहे.
ज्या मध्ये १ महिना कालावधीचा अनिवासी उद्योजकता विकास कार्यक्रम, १८ दिवस कालावधीचा निवासी उद्योजकता विकास कार्यक्रम, १ महिना कालावधीचा तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रम अंतर्गत गारमेंट मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रम, प्रस्थापित उद्योजकांसाठी निवासी आयात-निर्यात प्रशिक्षण कार्यक्रम तसेच मोफत एक दिवशीय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रकरण शिबीराचे आयोजन कोल्हापूर येथे करण्यात येत आहे. चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, मोची, होलार प्रवर्गातील) युवक-युवती व महिलांनी उद्योग-व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वत:चा स्वयंरोजगार निर्माण करावा हा या कार्यक्रम आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमामधून सहभागी प्रशिक्षणार्थींना उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, विविध क्षेत्रातील उद्योगसंधी, उद्योगाची निवड, बाजारपेठ पाहणी, उद्योग उभारणीचे विविध टप्पे, बाजारपेठ व्यवस्थापन, उद्योग संबंधीत कायदे, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, हिशेब पद्धती, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योगांना प्रत्यक्ष भेटी, डिजिटल मार्केटिंग, विविध शासकीय कर्ज योजना, सोयी सवलती आणि कार्य प्रणाली, तसेच उद्योग व्यवस्थापन याबाबत शासकीय अधिकारी व तज्ञांमार्फत विस्तृत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिवाय गारमेंट मेकिंग प्रशिक्षणामधुन गारमेंट मेकिंग ज्यामध्ये गारमेंट मशीनची ओळख व हाताळणी, गारमेंट कटिंग पद्धती, बेसिक टेलरिंग, गारमेंट टेलरिंग, विविध प्रकारचे गारमेंट्स तयार करणे उदा. शर्ट, पॅन्ट, नाईट सुट, परकर मेकिंग, ड्रेस मेकिंग, साडी मेकिंग, कापडी बॅग मेकिंग ई. बाबत प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
इच्छुकांकडून प्राप्त प्रवेश अर्जामधुन निवड समितीमार्फत प्रत्यक्ष मुलाखत घेऊन प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण प्रशिक्षण मोफत असून प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी दरम्यान चहा, नाष्टा, व्यवस्था तसेच निवासी प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये चहा, नाष्टा, भोजन-निवास व्यवस्था संस्थेमार्फत केली जाणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवार चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, मोची, होलार प्रवर्गातील ) असणे आवश्यक, शिक्षण किमान ७ वी पास, महाराष्ट्राचा रहिवाशी, तसेच उद्योग करण्याची प्रबळ इच्छा व १८ ते ५० वयोगटातील असावा.
चर्मकार समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, महिलांनी प्रवेश अर्ज व अधिक माहिती करिता प्रविण कायंदे, मो.नं. 9403078774 वनिता पाटील, मो. नं. 9422810863 प्रकल्प अधिकारी, एम.सी.ई.डी. द्वारा उद्योग भवन, महावीर गार्डन समोर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे बाजुला, कोल्हापूर येथे संपर्क करावा, असे आवाहन संत रोहिदास चार्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापक एन.एम. पवार यांनी केले आहे.