
no images were found
इसुझु मोटर्स इंडिया भारतभरात ‘इसुझु आय-केअर उन्हाळापूर्व शिबिर’ राबवणार
इसुझुची दर्जात्मक सेवा व मालकीहक्क अनुभव देण्याप्रती असलेली कटिबद्धता कायम राखण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नासह इसुझु मोटर्स इंडिया इसुझु डी-मॅक्स पिक-अप्स आणि एसयूव्हींच्या श्रेणीसाठी देशव्यापी ‘इसुझु आय-केअर उन्हाळापूर्व शिबिर’ राबवणार आहे. या सर्विस कॅम्पचा देशभरातील ग्राहकांना यंदाच्या हंगामादरम्यान त्रासमुक्त ड्रा ड्रायव्हिंगच्या अनुभवासाठी उत्साहवर्धक लाभ आणि प्रतिबंधात्मक मेन्टेनन्स तपासणी सुविधा देण्याचा मनसुबा आहे. ‘इसुझु केअर’चा उपक्रम उन्हाळापूर्व शिबिर 19 ते 24 मार्च 2024 दरम्यान (दोन्ही दिवसांसह) सर्व इसुझु ऑथोराइज्ड डिलर सर्विस आऊटलेट्समध्ये राबवण्यात येईल. या कालावधीदरम्यान ग्राहक त्यांच्या वाहनांसाठी स्पेशल ऑफर्स व लाभांचा देखील आनंद घेऊ शकतात.
उन्हाळापूर्वशिबिर’ अहमदाबाद, बारामुल्ला, बेंगळुरू, बिमावरम, भुज, भुवनेश्वर, कालिकत, चेन्नई, कोईम्बतूर, दिल्ली, दिमापूर, दुर्गापूर, गांधीधाम, गोरखपूर, गुरुग्राम, गुवाहाटी, हैदराबाद( कुकटपल्ली आणि एल. बी. नगर), इंदौर, जयपूर, जयगाव, जालंधर, जम्मू, जोधपूर, कोची, कोलकाता, कोल्हापूर, कुर्नूल, लेह, लखनौ, मदुराई, मंडी, मंगलोर, मेहसाणा, मोहाली, नवी मुंबई, मुंबई, नागपूर, नाशिक, नेल्लोर, नोएडा, पुणे, रायपूर, राजमुंद्री, राजकोट, सिलीगुडी, सुरत, तिरुपती, त्रिवेंद्रम, त्रिची, वडोदरा, विजयवाडा आणि विशाखापट्टणम येथील इसुझुच्या सर्व ऑथोराइज्ड सर्विस केंद्रांमध्ये राबवण्यात येईल.
ग्राहक सर्विस बुकिंगसाठी जवळच्या इसुझु डिलर आऊटलेलशी संपर्क साधू शकतात किंवा https://www.isuzu.in/connecttoservice या वेबसाइटला भेट देऊ शकतात. तसेच अधिक माहितीसाठी ग्राहक १८०० ४१९९ १८८ (टोल-फ्री) या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.