Home शासकीय मतदार जागृती (SVEEP) अंतर्गत ९५०० विद्यार्थ्यांमार्फत भव्य मानवी रांगोळी-  के. मंजुलक्ष्मी 

मतदार जागृती (SVEEP) अंतर्गत ९५०० विद्यार्थ्यांमार्फत भव्य मानवी रांगोळी-  के. मंजुलक्ष्मी 

18 second read
0
0
38

no images were found

मतदार जागृती (SVEEP) अंतर्गत ९५०० विद्यार्थ्यांमार्फत भव्य मानवी रांगोळी-  के. मंजुलक्ष्मी 

कोल्हापूर  : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन २०२४ साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने कोल्हापूर शहरातील २६ शाळांमधील ९५०० विद्यार्थ्यांची भव्य मानवी रांगोळी करण्यात येणार आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन २०२४ मतदार जागृती (SVEEP) अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेमार्फत गांधी मैदान या ठिकाणी दिनांक १९ मार्च, २०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजता हि मानवी रांगोळी करण्यात येणार आहे.          सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन २०२४ मतदार जागृती (SVEEP) कार्यक्रमाअंतर्गत प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांचे अध्यक्षतेखाली आज महापालिकेतील छत्रपती ताराराणी सभागृहात मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी उपस्थित शाळा मुख्याध्यापकांना निवडणूकीच्या जनजागृती विषयी मार्गदर्शन केले. यामध्ये २६ शाळांमधील ९५०० विद्यार्थ्याचा (शाळा, स्काउट गाईड, एन सी सी युनिफॉर्मसह) सहभाग असले. यावेळी विद्यार्थ्यांमार्फत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती पर घोषवाक्ये तयार करण्यात येत आहेत. ५० कला शिक्षक, क्रीडा शिक्षक यांचे मार्फत विद्यार्थ्यांची मानवी रांगोळी चे रेखाटन करण्यात येणार आहे. या उपक्रमाची एशियन पॅसिफिक बुक रेकोर्ड मध्ये नोंदणी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील.

            यावेळी नोडल ऑफिसर तथा जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था नीलकंठ करे, सहाय्यक नोडल ऑफिसर तथा वित्त व लेखा अधिकारी वर्षा परीट, प्रशासनाधिकारी शंकर यादव, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद दिगंबर मोरे, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव उपस्थित होते. यावेळी शाळा मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, कला शिक्षक उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…