
no images were found
“नया साल नया जोश” 2.0 मोहीमेस वाढ
कोल्हापूर : ग्रामीण भागातील जनतेला पोस्टाच्या माध्यमातून जास्तीत जास्त बँकिंग सुविधा मिळाव्यात, तसेच पोस्टाच्या ग्राहकांना आर्थिक लाभाच्या विविध योजनांचा थेट फायदा मिळावा या हेतूने ‘नया साल नया जोश’ मोहिमेचे आयोजन गोवा क्षेत्रिय कार्यालयाने केले होते. या योजनेला मिळालेला उदंड प्रतिसाद बघून गोवा क्षेत्रिय कार्यालयाने “नया साल नया जोश” 2.0 मोहीम 31 मार्च पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे या कालावधीत खाती उघडून जिल्ह्यातील ग्राहकांनी पोस्टाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी केले आहे.
कोल्हापूर विभागाला 97 हजार 400 नेट खाती उघडण्याचे उद्दिष्ट दिले होते. या उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर विभागात पोस्टाच्या विविध बचत योजनांची 1 लाख 19 हजार 356 खाती उघडली गेली व 14 हजार 655 खाती बंद झाली. या प्रकारे (119356 – 14655= 104701) नेट खाती उघडली गेली व दिलेल्या उद्दिष्टाच्या 107 टक्के साध्य होवून गोवा रिजन मध्ये पहिला क्रमांक पटकावला.
मोहिमेत सहा उपविभागांनी उत्साहात सहभाग घेतला. डाक निरीक्षक कागल उपविभाग अभिजित जाधव यांनी गोवा रिजनमध्ये पहिला क्रमांक मिळविला. सहा. अधिक्षक पश्चिम उपविभाग दत्ता मस्कर यांनी दुसरा तर डाक निरीक्षक गारगोटी उपविभाग योगेश्वर चीतमुगरे यांनी चौथा क्रमांक पटकावला. या मोहिमेत इचलरंजी, गडहिंग्लज, उत्तर उपविभाग यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच त्यामध्ये प्रत्येक महिला प्रधान एजंटना कमीतकमी 100 व त्यानंतर 500 खाती उघडण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये अनिता विभूते, कागल व अनुराधा घोरपडे, एमआयडीसी गोकुळ शिरगाव या एजंटांनी 500 पेक्षा जास्त खाती उघडून योगदान दिले.