no images were found
आपत्ती व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा
कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शिव सहाय्यता आपत्ती व्यवस्थापन केंद्र ,राष्ट्रीय सेवा योजना कक्ष ,वन विभाग कोल्हापूर आणि अग्निशमन विभाग कोल्हापूर महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २ मार्च २०२४ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या शाहू सभागृहामध्ये आपत्ती व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे मानव्यशास्त्र शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. महादेव देशमुख यांनी केले . याप्रसंगी शिव सहाय्यता आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे समन्वयक डॉ.एस.एम. गायकवाड तसेच शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.टी.एम.चौगुले प्रमुख उपस्थित होते. सुरवातीला शिव सहाय्यता आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे समन्वयक डॉ.एस.एम. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. टी. एम. चौगले यांनी उपस्थित सहभागींना आपत्ती व्यवस्थापन या विषयावर विस्तृत मार्गदर्शन त्यादरम्यान महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे झालेल्या व संभाव्य सर्व शक्यता कथन केल्या. त्याचबरोबर मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती बेसिक समजावून सांगितले . आपत्ती व्यवस्थापनातील धोका, असुरक्षितता, जोखीम इत्यादी संकल्पना आणि तयारी कशी आहे. आपत्तीच्या काळात आणि नंतरचा प्रभाव कमी करण्यासाठी आपत्तीपूर्व कालावधी उपयुक्त ठरू शकतो. ती आपत्तीनंतर पुनर्वसन शिबिरांसाठी मानक कार्यपद्धती स्पष्ट केली. मानव्यशास्त्र शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. महादेव देशमुख यांच्या हस्ते कुंडीतील रोपास जलार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. डॉ. देशमुख मार्गदर्शन करताना म्हणाले कि संपूर्ण मानव जातीला निसर्गनिर्मित, मानवनिर्मित व अनिश्चित अशा संकटाना अर्थात आपत्तींना सामोरे जावे लागते आहे. अशावेळी आपत्तीपूर्व व आपत्तीनंतरचे निर्माण होणाऱ्या समस्या व प्रश्न सोडवणे आवश्यक असते. मनुष्याचे जीवन सुरक्षित व सुखकर होणेसाठी सर्व समस्यांचा स्वतंत्र अभ्यास व
व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेली व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे. अशावेळी शिव सहाय्यता आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाची राष्ट्रीय सेवा योजनेची एक स्वतंत्र आपत्ती निवारण फौज निर्माण होत आहे. त्याचबरोबर सर्व अर्थानी उत्तमरीत्या प्रशिक्षित असणारी यंत्रणा-शासकीय, सांघिक, सामाजिक व वैयक्तिक पातळीवरही असणे हे खूप महत्त्वाचे आहे, किंबहुना ही काळाची गरज असल्याबाबतचे मत याप्रसंगी डॉ. महादेव देशमुख यांनी व्यक्त केले.
नुकत्याच शेंडा पार्क येथील मानवनिर्मित वणवा मुळे जी वृक्षसंपदा आगीच्या भक्षस्थानी पडली त्या पार्श्वभूमीवर श्री जी . गुरुप्रसाद , उपवनसंरक्षक कोल्हापूर वन विभाग यांनी केलेल्या वनवणवा जन जागृती अभियानाची सुरुवात श्री रमेश कांबळे वन परिक्षेत्र अधिकारी करवीर, शैलेश सर वनरक्षक, मुलाणी सर वनरक्षक , घोलप सर या वनविभागातील कर्मचाऱ्यांनी वनवणवा रोखण्यासाठी उपाययोजना जसे कि जाळरेषा काढणे व त्यासाठी आवश्यक उपकरणे यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आणि इतर वणवा विझविण्याच्या संशोधनाबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली.या वेळी डॉ . एस .एन सपली संचालक तंत्रज्ञान अधिविभाग हे उपस्थित होते. या वेळी श्री रमण कुलकर्णी सदस्य राज्य वन्यजीव मंडळ यांनी design केलेली वन वणवा विषयी जनजागृती पोस्टर अनावरण करण्यात आले. प्रथम सत्रात मा.श्री सत्यजीत देसाई ,समुपदेशक,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी आपत्ती, आपत्तीचे प्रकार, आपत्ती पूर्व व्यवस्थापन या संज्ञांचे विस्तृत आढावा घेतला. आपत्तीची भीषणता व त्या प्रसंगी असणारी मानसिकता याबाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात शिवाजी शिवाजी विद्यापीठाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विनिता रानडे यांनी अत्यंत मौलिक मार्गदर्शन करीत त्यांनी CPR ची विस्तृत माहिती दिली व प्रात्याक्षिकही करून दाखवले. प्रथमोपचार देऊन CPR चे आपत्तीग्रस्त व्यक्तीला वाचवता येते हे सांगितले. विद्यापीठाच्या मेडिकल इमर्जन्सी मध्ये कशा प्रकारची दक्षता घ्यायची याबाबत माहिती दिली. दुपारच्या सत्रात जीव रक्षक दिनकर कांबळे यांनी प्रात्यक्षिकांसह विविध आपत्ती बाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. समारोपाच्या सत्रामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेतील अग्निशमन दलातील जवानांनी अग्निशमन बद्दल प्रात्यक्षिके करून दाखवली तसेच फायर फायटर व्हॅन व फायर एस्टीन्ग्विशरची प्रात्यक्षिक करून दाखवले व सहभागी मुलांकडून त्याचा सराव घेण्यात आला. त्याचबरोबर प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी वापरण्यात येणारी विविध उपकरणे आणि त्यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले आणि उपकरण बाबत माहिती दिली. त्याचबरोबर बचाव कार्य करत असताना घ्यायच्या काळजीबाबत ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे व व प्रशिक्षणार्थींचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.टी.एम.चौगुले यांनी मानले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून श्री अमोल कुलकर्णी यांनी काम पहिले त्यांना सुजित मुंढे, सुरेखा आडके यांचे सहकार्य लाभले. २२५ प्रशिक्षणार्थीनी या कार्यशाळेत सहभाग घेतला .