Home शासकीय मुंबई येथे 126 वी डाक अदालत

मुंबई येथे 126 वी डाक अदालत

21 second read
0
0
106

no images were found

मुंबई येथे 126 वी डाक अदालत

कोल्हापूर  :  मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबईव्दारे दि. 19 मार्च 2024  रोजी  दुपारी 3  वाजता  मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांच्या कार्यालयामध्ये 126  व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले  आहे, अशी माहिती कोल्हापूर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक  ए.व्ही.इंगळे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. (उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इ.)

संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार  सहायक निदेशक डाक सेवा (ज.शि.) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, मुंबई एनेक्स बिल्डींग, जी.पी.ओ. कॉम्प्लेक्स, 4 था माळा, मुंबई 400001 यांच्या नावे दोन प्रतींसह दि. 11 मार्च पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…