Home सामाजिक कोटक आणत आहे महत्त्वाकांक्षी ग्राहकांसाठी ‘स्मार्ट चॉइस’ सुवर्णकर्ज

कोटक आणत आहे महत्त्वाकांक्षी ग्राहकांसाठी ‘स्मार्ट चॉइस’ सुवर्णकर्ज

34 second read
0
0
21

no images were found

कोटक आणत आहे महत्त्वाकांक्षी ग्राहकांसाठी स्मार्ट चॉइस’ सुवर्णकर्ज

 

कोल्हापुर : कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने (‘केएमबीएल’/ ‘कोटक’) आज महत्त्वाकांक्षी ग्राहकांसाठी स्मार्ट चॉइस गोल्ड लोन या एका स्मार्ट उत्पादनाची घोषणा केली. ५ महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांसह कोटक स्मार्ट चॉइस गोल्ड लोन्स पारंपरिक कर्ज उत्पादनांना एक आकर्षक पर्याय पुरवते. केवळ ०.८८ टक्के इतका निश्चित मासिक व्याजदर, शून्य प्रक्रिया शुल्क*, त्याच दिवशी वितरण**, परतफेडीसाठी लवचिक पर्याय आणि कमीत-कमी कागदपत्रांची आवश्यकता ही या उत्पादनाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, भारतीय कुटुंबांमध्ये सुमारे २७,००० टन सोने आहे. शिवाय, डिसेंबर’२३ मधील सिबिल डेटानुसार, सुवर्णकर्जाच्या उद्योगाने ७१.५ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. गेल्या ३ वर्षांपासून हा उद्योग १९ टक्के सीएजीआरने वाढलेला आहे. सोन्याच्या वाढत्या किमती आणि बँका व एनबीएफसींद्वारे सुवर्णकर्जे सुलभरित्या उपलब्ध होणे यांमुळे अधिकाधिक ग्राहक कर्जाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचे मूल्य उपयोगात आणू लागले आहेत.

कोटक ‘स्मार्ट चॉइस’ गोल्ड लोन हे उत्पादन बँकेने केलेल्या ग्राहक संशोधनाच्या आधारे विकसित करण्यात आले आहे. ग्राहकांना कर्ज प्राप्त करण्यासाठी जास्तीत-जास्त मूल्य व लवचिकता देऊ करणाऱ्या उत्पादनाची गरज यांतून अधोरेखित झाली आहे.

अन्य कर्ज उत्पादनांसाठी पात्रतेचे निकष अत्यंत काटेकोर आहेत. मात्र, सुवर्णकर्जासाठी अर्ज करण्याची व त्याच्या वितरणाची प्रक्रिया खूपच सुलभ आहे. सोन्याचा तारण म्हणून वाप करून कर्जदार पारंपरिक व्याजदरांच्या तुलनेत कमी व्याजदरांचा लाभ घेऊ शकतात, त्यामुळे कर्जाच्या मुदतीत त्यांचा खर्च बऱ्यापैकी वाचतो.

कोटक महिंद्रा बँकेतील रिटेल अॅग्रिकल्चर अँड गोल्ड लोन्स विभागाचे अध्यक्ष श्रीपाद जाधव म्हणाले, “सुवर्णकर्ज हे वैविध्यपूर्ण वित्तीय उत्पादन आहे आणि ग्राहकांच्या अनेकविध गरजा ते पूर्ण करते. सहज उपलब्धता, अर्ज केलेल्या दिवशीच प्रक्रिया, आकर्षक दर आणि सोन्याच्या दागिन्यांची सुरक्षितता यामुळे महत्त्वाकांक्षी ग्राहकांसाठी हा आकर्षक पर्याय ठरत आहे. परिणामी, अन्य कर्ज उत्पादनांच्या तुलनेत किफायतशीर परिणाम म्हणून सुवर्णकर्जाचा विचार करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. यातून ग्राहकांच्या आर्थिक वर्तनाचा बदलता कलही दिसून येतो. कोटक स्मार्ट चॉइस’ गोल्ड लोन्स इच्छा व वास्तव यांच्यातील दरी भरून काढणारे एक सुलभ व खात्रीशीर वित्तीय साधन म्हणून काम करू शकते.”

हे उत्पादन बाजारात आणण्यासाठी एक नवीन मल्टिमीडिया जाहिरात अभियान १ मार्च, २०२४ पासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात हे अभियान महाराष्ट्र व कर्नाटकातील टीव्ही, डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून प्रसारित केले जाईल.

कोटक महिंद्रा बँकेच्या रिटेल लायबिलिटी उत्पादन विभागाचे प्रमुख तसेच अध्यक्ष आणि मुख्य मार्केटिंग अधिकारी रोहित भसिन म्हणाले, “आजच्या ग्राहकांचा दृष्टिकोन महत्त्वाकांक्षी आहे तसेच कर्जाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन मूल्य-जागरूक आहे. आपल्या महत्त्वाकांक्षांना आर्थिक पाठबळ देऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी सुवर्णकर्ज हा एक स्मार्ट व सुरक्षित पर्याय आहे. हे सर्व लाभ तसेच सुवर्णकर्जांचे मूल्य व उपयुक्तता जाणकार ग्राहकांना समजावून देण्याचे उद्दिष्ट आमच्या जाहिरात अभियानामागे आहे. यात कोटक ‘स्मार्ट चॉइस’ सुवर्णकर्जाचा दर, सोय आणि सुरक्षितता ही वैशिष्ट्ये विविध उदाहरणांच्या माध्यमातून प्रकाशात आणली जाणार आहेत.”

कर्ज मिळवण्याचा चतुर उपाय अर्थात सोन्याचे दागिने समोर असूनही व्यक्ती कर्ज मिळवण्याचे अन्य मार्ग आणि साधने यांचा कसोशीने शोध घेत राहतात हे टीव्हीसीद्वारे (जाहिरात) दाखवण्यात आले आहे. सर्व लोकसंख्या समूहांतील ग्राहकांना आपल्याशा वाटणाऱ्या आकर्षक कथनाद्वारे कोटक सुवर्णकर्ज प्राप्त करण्यातील सुलभता व सोय अधोरेखित करत आहे. झटपट व विनाकटकट आर्थिक सहाय्य हवे असणाऱ्या ग्राहकांसाठी सुवर्णकर्ज हा कसा व्यवहार्य पर्याय आहे हे या जाहिरातीतून पटवून दिले जाणार आहे. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…