Home क्राईम विमानतळावर महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं २ किलो सोनं

विमानतळावर महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं २ किलो सोनं

0 second read
0
0
109

no images were found

विमानतळावर महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं २ किलो सोनं

कोलकत्ता : नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा प्रकार उघडकीस आला आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी चालू असताना पोलिसांना एका महिलेकडे २ किलो सोनं सापडलं आहे. हे सोनं बॅग किंवा खिशात नसून चक्क तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आढळून आले. हा प्रकार पाहून पोलिस देखील सुन्न झाले.

कोलकत्त्यातल्या नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची सीमाशुल्क विभागाचे अधिकाऱ्यांकडून तपासणी चालू होती. याप्रसंगी एका परदेशी महिलेचं वागणं सुरक्षारक्षकांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी तिची झडती घेतली. तेव्हा हा धक्कादायक प्रकार या अधिकाऱ्यांसमोर उघडकीस आला. या महिलेने आपल्या अंतर्वस्त्रात आणि प्रायव्हेट पार्टमध्ये जवळपास २ किलो सोनं लपवलं होतं. सुदानवरुन परतलेल्या या महिलेकडून १ हजार ९३० ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे. सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत ९६ लाखाहूनही अधिक आहे. सुदानची नागरिक असलेल्या लामिस शरीफ या महिलेची अधिकाऱ्यांनी झडती घेतली. विचारपूस करताना तित्या महिलेच्या उत्तरांमध्ये गोंधळ असल्याची शंका आल्याने तिची झडती घेतल्यावर महिलेच्या अंतर्वस्त्रात दोन पाकिटांमध्ये सोनं आढळून आले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …