Home शासकीय सोमवारी ‘जनता दरबार’ : तक्रारींच्या निराकरणासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे

सोमवारी ‘जनता दरबार’ : तक्रारींच्या निराकरणासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे

8 second read
0
0
26

no images were found

सोमवारी ‘जनता दरबार’ : तक्रारींच्या निराकरणासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे

     कोल्हापूर  : वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपले प्रश्न, अर्ज, निवेदन व अडचणी सोडविण्यासाठी जनता दरबारात उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे. आपल्या समस्यांविषयी लेखी अर्ज सोबत आणणे आवश्यक आहे.

       बैठकीसाठी जिल्हाधिकारी तसेच कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, महसूल विभागाचे सर्व विभाग प्रमुख, सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,  सहायक आयुक्त समाज कल्याण, सहायक संचालक नगररचना, सहायक आयुक्त अन्न, औषध प्रशासन विभाग अशा विविध विभागांचे विभाग प्रमुखही  उपस्थित राहणार आहेत.

Load More Related Articles

Check Also

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे  

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे   …